Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भूमिका छोट्याच…पण जीव ओतून साकारणारे किशोर नांदलस्कर!

April 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
Kishore Nandlaskar

संजीव वेलणकर

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे आज कोरोनाने निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनानंतर मनात जागलेल्या त्यांच्या भूमिकांच्या आठवणी जागवत त्यांना वाहिलेली शब्दांजली…

किशोर नांदलस्कर!
जन्म.१९४२
मुंबई येथे.

नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

नांदलस्कर कुटुंब मूळचे खारेपाटण तालुक्यातील शेजवली गावचे. त्यांचा जन्म मुंबईचाच. किशोर नांदलस्कर यांचे बालपण मुंबईतील लॅमिंग्टन रोड, नागपाडा, घाटकोपर या भागात गेलं. किशोर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. जुन्या काळात त्यांनी अनेक नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून देखील त्यांनी काम केले होते.

पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपिटर’गिरणीत नोकरी करू लागले. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी तसेच कामगार नाटय़स्पर्धेतही नाटके बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यामुळे लहानपणापासूनच नांदलस्कर यांना अभिनयाचं वेड लागलं होतं.

एक दिवस त्यांनी वडिलांना मलाही नाटकात काम करायचं आहे, असं सांगितलं. वडिलांनीही होकार दिला आणि १९६०-६१ च्या सुमारास सादर झालेल्या ‘आमराई’ या नाटकात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नंतर ते नोकरी करत नाटकात काम करत होते. किशोर यांनी सुमारे ४० नाटकं, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमध्ये काम केलंय. ‘हळद रुसली कुंकू हसली’, ‘शेजारी शेजारी’, ‘सारे सज्जन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘वन रुम किचन’, ‘भ्रमाचा भोपळा’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी नव्याने रंगभूमीवर सादर केलं. यावेळी दिलीप प्रभावळकर यांची नाटकातली ‘राजा’ची भूमिका किशोर यांनी साकारली होती. ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने सादर करण्यात आलं होतं. यातीलही प्रभावळकरांची भूमिका नांदलस्कर यांनी साकारली होती. या दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी आपल्या खास अंदाजात सादर केल्या होत्या.

किशोर नांदलस्कर यांचे ‘नाना करते प्यार’ हे व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होते. किशोर नांदलस्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

sanjeev velankar

(संजीव वेलणकर हे पुण्यातील ख्यातनाम कॅटरिंग व्यावसायिक आहेत. ते विविध विषयांवर सातत्याने लेखन करतात. हा व इतर लेख त्यांच्या फेसबुक पेजवरही उपलब्ध आहेत.)

संपर्क ९४२२३०१७३३      ट्विटर @velsons 


Tags: coronaKishore Nandlaskarsanjeev velankarकिशोर नांदलस्करकोरोनासंजीव वेलणकर
Previous Post

शिरुरच्या त्रिमूर्ती कार्यालयात १०० खाटांचे कोरोना सेंटर

Next Post

“कर्ज काढा, पण सर्वांचे लसीकरण करा!” : नाना पटोले

Next Post
nana patole

"कर्ज काढा, पण सर्वांचे लसीकरण करा!" : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!