मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलेल्या स्टिंग स्फोटाचे पडसाद बुधवारीही जाणवत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. “खोटे पुरावे, खोटे साक्षीदार, हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम आहे.महाराष्ट्र पोलिसांना असं खोटं करायचं असेल तर सीबीआयकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. तसंच फडणवीसांच्या या स्टिंगचं स्क्रिप्ट कुणाचं, पात्र कोणती त्याच्या मुळाशी सरकार जाणार आणि दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन येणार, अशा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र पोलीस दबावाखाली काम करत नाहीत!
- विरोधी पक्षनेते असल्यानं त्यांचं आरोप करण्याचे कामच आहे. त्यांनी ते केले.
- पण महाराष्ट्र पोलिसांवरचे आरोप खोटे आहेत.
- महाराष्ट्राचे पोलीस असे कधीच करत नाहीत.
- महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगलं प्रशिक्षण आहे.
- महाराष्ट्राची पोलीस खोट्या दबावाखाली कारवाया करत नसल्याने त्यांची एक प्रतिष्ठा आहे.
- काही कुंभांड करायचं असेल तर त्यासाठी राज्य पोलिसांना ईडी, सीबीआयकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल.
- खोटे पुरावे, खोटे साक्षीदार कसे उभे करायचे हेच सध्याच्या केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आहे.
स्टिंग नाट्य नेमकं कुणाचं?
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमागे नेमकं कोण आहे, हे शोधून काढलं जाईल.
- “हे स्क्रिप्ट कोणी लिहिलेलं आहे, भाजपाचे सलीम-जावेद कोण आहेत? त्यातली पात्रं कोणती आहेत? नेपथ्य कोणाचं आहे? दिग्दर्शन कोणाचं आहे?
- या सर्वात्याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल.
- दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन सरकार समोर येईल.