मुक्तपीठ टीम
अमरावती खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान केले आहे. यावर शिवसैनिक आक्रमक तर झालेच आहेत. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा राणांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील. शिवसैनिक आता गप्प बसणार नाहीत, असा इशारा राऊतांनी दिला आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नये अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.
तर शिवसैनिकांनाही चिडून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार!
- शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “कुणाच्यातरी पाठबळात तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल, मुंबईत येऊन, तर शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का?
- कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाला सांगू नका.
- कायदा आणि सुव्यवस्था काय आहे? आणि सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे? हे सल्ले तुमच्याकडून ऐकून अंमलबजावणी करण्या इतपत महाराष्ट्राला भिकारीपण आलेलं नाही.
- तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसताय, हिंमत नाही घुसण्याची पण बदनाम करताय, कोण तुम्ही ? तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा, तुम्ही जर तुमची लक्ष्मणरेषा ओलांडली, तर मग शिवसैनिकांनाही चिडून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार आहे.”
तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्हालाही घरं…
- “आम्हाला धमक्या देऊ नका.
- राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय तपास यंत्रणा येतील, या धमक्या देऊ नका.
- हिंमत असेल तर सीबीआय लावा, ईडी लावा.
- आम्हाला त्रास द्या.
- आम्ही तुम्हाला घाबरत नाही.
- आता शिवसैनिकांवर कोणाचाही कंट्रोल नाही.
- अजून काहीच सुरु झालेलं नाही.
- दोन दिवसांपासून ज्या घटना पाहताय तुम्ही मुंबईत.
- या फक्त शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही, तर जनतेच्या भावनांचा हा स्फोट आहे.
- मी सध्या नागपुरात आहे.
- मी इथून सगळं वातावरण पाहतोय.
- तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्हालाही घरं आहेत. हे लक्षात घ्या.
- तसेच, “केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांचीही गरज नाही.
- शिवसैनिक सक्षम आहेत.
- आणि शिवसैनिक सदैव मरायला आणि मारायला तयार असतो.
- सरकार असल्यामुळं नक्की आमचे हात बांधले गेले आहेत.
हजारो, लाखो शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत…
- “सरकार स्पॉन्सर्ड, पोलीस स्पॉन्सर्ड मग तुम्ही काय करताय?
- केंद्र सरकार स्पॉन्सर्ड, केंद्रीय पोलीस दल स्पॉन्सर्ड… ही तुमची जी गुंडगिरी आहे ना, झुंडशाही.
- याच झुंडशाहीला शिवसैनिकांनी त्याच झुंडशाहीनं उत्तर दिलं, तर तुम्हाला का मिरच्या झोंबतायत? कशासाठी? तुम्ही जर आमच्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न केला, तर तो शिवसैनिक आहे, हा महाराष्ट्र आहे.
- हजारो, लाखो शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत.”
शिवसेना हीच एक पॉवर!
- “आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. लावा राजवट.
- माझं आत्ताच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी यापलिकडे आम्ही गेलोय. सत्तेची पर्वा आम्हाला नाही.
- बाळासाहेबांचं एक अजरामर वाक्य आहे.
- आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी आली आहे.
- सत्ता फक्त खुर्चीची नसते.
- शिवसेना हीच एक पॉवर.
- तुम्हाला जर त्याचा चटका घ्यायचा असेल, तर तुम्ही घेऊ शकता.
- यापूर्वी लोकांनी घेतलाय.
- जे होतंय ते होऊन जाऊ देत. एकदाच होईल.