Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत शिवसेनेचा राडा! ठाकरे सरकारविरोधात भाजपा आक्रमक! पण राष्ट्रपती राजवटीची मागणी नाही!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP press Conference on shivsena FIghts with Rana Couple

मुक्तपीठ टीम

मुंबईसह महाराष्ट्रात अराजक माजल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा यांनी या पत्रकार परिषदेत आक्रमकतेनं ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, भाजपाची राष्ट्रपती राजवटीची मागणी नसल्याचे आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. सकाळपासून चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी केलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीमुळे शिवसेनेसह आघाडीतील पक्षांना राजकीय फायदा होण्याची शक्यता असल्याने भाजपाने त्याबाबतीत आस्ते कदम केल्याची शक्यता आहे.

 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या मातोश्रीत हनुमान पठनाच्या इशाऱ्यानंतर मुंबईत शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिक मातोश्रीबाहेर पहारा देत आक्रमकता दाखवत असतानाच राणांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरही मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमले आहेत. त्याचवेळी शुक्रवारी रात्री भाजपाचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. याआधीही भाजपाच्या पोलखोल यात्रांनाही शिवसेनेचा विरोध केला. त्याचा उल्लेख करत भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

 

भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल!

  • नवनीत राणा, रवी राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचा जमाव
  • भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला
  • आर्यन खान प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू
  • आर्यन खान प्रकरणातील अधिकाऱ्यावर मंत्र्यांचीच टीका
  • किरीट सोमय्या यांच्याबाबतीत सरकारी छळवाद
  • भाजपाच्या पोलखोल यात्रेच्या गाडीवर हल्ला
  • भाजपाच्या पोलखोल सभांना शिवसैनिकांचा विरोध

 

प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. आमदार आशिष शेलार यांनी आक्रमकतेने शिवसेनेवर टीका करतानाच भाजपाची पुढची भूमिका सांगितली. त्यानुसार भाजपा पोलीस आयुक्तांना भेटून तक्रारी करणार आहेत. मात्र, राज्यात अराजक माजले असले तरी भाजपाने राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सकाळपासून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेली राष्ट्रपती राजवटीच्या मागणीपासून भाजपाने वेगळी भूमिका असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवटी लावण्याच्या धमकीनं शिवसेनेला फरक पडत नाही, अशी भूमिका मांडली. त्यामुळे भाजपाचा त्या मागणीमुळे फायदा होण्यापेक्षा शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीला राजकीय फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच भाजपाने राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर पक्ष म्हणून थेट न बोलता टप्प्या-टप्प्यानं काहीसं आस्तकदम जाण्याची भूमिका घेतली असण्याची शक्यता आहे.


Tags: ashish shelarBJPNavneet ranapravin darekarRavi RanaShivsenaThackeray governmentआशिष शेलारठाकरे सरकारनवनीत राणाप्रवीण दरेकरभाजपारवी राणाशिवसेना
Previous Post

#मुक्तपीठ #Live मुंबईत शिवसेनेचा राडा! ठाकरे सरकारविरोधात भाजपा आक्रमक!

Next Post

आता शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, राष्ट्रपती राजवटीला घाबरत नाही! – संजय राऊत

Next Post
Sanjay Raut (7)

आता शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, राष्ट्रपती राजवटीला घाबरत नाही! - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!