Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांचा आता पुराव्यांवरून भाजपाशी सामना! कसा ते वाचा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raut vs bjp

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील घरावर ईडीने छापा टाकल्याने राज्यकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधत भाजपा नेते रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? असा उपरोधात्मक प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच ईडीच्या कारवाईनंतर राऊतांनी पहिल्यांदाच आघाडीतील मतभेदावर भाष्य केले आहे.

 

भाजपा नेते रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे.

 

भाजपामध्ये सर्वच चांगले आहेत का? असा एकही व्यक्ती भाजपामध्ये नाहीये का?

  • भाजपा नेते रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? सर्वच रस्त्यावर बसून भीक मागत आहेत का?
  • कुणी चणे विकतंय, कुणी भेळपुरी विकतंय, कुणी पावभाजींची गाडी लावून जगत आहेत असं काही आहे का?
  • तुमच्याकडे काय आहे. तुम्ही जे शकडो हजारो कोटी खर्च करून निवडणुका लढत आहात तो पैसा कुठून येतो.
  • तुमचे इमले, बंगले कसे उभे राहिले.
  • आम्ही दिलेले कागदपत्रे पुरावे ठरत नाहीत, पण तुमचे चिटोरे पुरावे ठरतात.
  • हा न्याय नाही.
  • परत परत सांगतो, घाई नाही.
  • पण सर्व समोर येईल.
  • मोकळेपणाने श्वास घेण्याच्या स्वातंत्र्यावरचं हे संकट आहे.
  • पण हे काही काळच राहणार.

 

हीच मोहीम उद्या भाजपावर उलटल्या शिवाय राहणार नाही!

  • आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत.
  • पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे.
  • मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचं लक्ष नाही.
  • केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू आहे.
  • काल पाटणकरांवर कारवाई केली.
  • त्या कारवाई मागचं सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावं.
  • हे नीट समजून घ्या.
  • चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत.
  • हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील.
  • ही आमच्याविरोधातील बदनामीची मोहीम आहे.
  • हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही.
  • मी पूर्ण विश्वासाने सांगतो आत्मविश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार आहे.

 

भाजपाच्या घोटाळ्यांवर सोमय्या बोलले का?

  • सोमय्यांना काहीही बोलू देत.
  • त्यांच्या बोलण्याला कोण विचारतं.
  • ते काहीही बोलतात.
  • हवाला किंगशी भाजपाचे काय संबंध आहेत याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला दिलेत ना.
  • त्यापुराव्याबाबत मला पोचपावती आले आहे.
  • त्यावर करतंय का ईडी कारवाया?
  • भाजपच्या घोटाळ्यावर सोमय्या बोलले का? सोमय्यांनी ज्या नेत्यांविरोधात ईडीकडे कारवाईची मागणी केली, ज्या नेत्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली, ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर सोमय्यांची वाचा गेली.
  • अशा माणसावर काय विश्वास ठेवायचा?

 

ही हुकूमशाहीची नांदी

  • पाटणकर प्रकरणात मालमत्ता जप्त करण्यापूर्वी चौकशी करायला हवी होती.
  • पण त्यांनी कारवाई केली.
  • ही हुकूमशाहीची नांदी आहे.
  • कुणी कुणाला घाबरलेलं नाही. का घाबरायचं? सर्वांनी एकजुटीने लढावं ही महाविकास आघाडीची भूमिका आहे.

 

असं कधी सरकार अस्थिर होतं का?

  • ईडीच्या कारवायांनी सरकार अस्थिर होईल असं काही नाही. असं कधी सरकार अस्थिर होतं का?
  • उलट सरकार अधिक मजबूत झालं.
  • आमच्यात ज्या काही फटी पडल्याचं वाटत होतं, त्या फटी बुजल्या आहेत.
  • आमच्यात मतभेद असल्याच्या काही ठिकाणी संशयाला जागा होत्या, त्या बुजल्या आहेत.
  • या निमित्ताने आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रं आले आहेत.

 

या अभियानाला सुरुवात झाल्यानंतर ईडीच्या कारवाया

  • जितेंद्र नवलानी प्रकरणी कारवाई सुरू आहे.
  • एक सूत्रं लक्षात घ्या. कालपासून विदर्भ, मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू झालं.
  • हे अभियान सुरू झाल्यानंतर त्याचा वेग पकडू लागला.
  • या अभियानाला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
  • या अभियानाला प्रसिद्धीही मिळत आहे.
  • या अभियानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर ईडीच्या कारवाया सुरू झाल्या.
  • काल सकाळपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्याबरोबर ईडीने ही कारवाई सुरू केली आहे.
  • या अभियानावरून लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे

Tags: BJPcm uddhav thackeraysanjay rautshridhar patankarभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेश्रीधर पाटणकरसंजय राऊत
Previous Post

Maharashtra Assembly session Live महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन लाइव्ह २३-३-२२ (३)

Next Post

कोरोना निर्बंधांचा अंत! मास्क कधी जाणार?

Next Post
corona (2)

कोरोना निर्बंधांचा अंत! मास्क कधी जाणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!