Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनाभवनात ४ वाजता कुणाचे वाजणार १२? संजय राऊतांची पुन्हा पत्रकार परिषद!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay RAut Pc 08 03 22

मुक्तपीठ टीम

शिवसेना खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना भवनात दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. याआधीही राऊतांनी १५ फेब्रुवारीला शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपासह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते.संजय राऊतांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या हे होते. त्यामुळं आज चार वाजता ते कुणाचे बारा वाजवणार हा चर्चेचा विषय झाला आहे. राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र देत काही ईडी अधिकाऱ्यांच्या वसुली रॅकेटबद्दल पुरावे सादर केले होते. आता ते पत्रही पत्रकार परिषदेत उघड केले जाईल. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवांनंतर आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरीही आयकर धाड सुरु आहे. त्यावरही ते बोलण्याची शक्यता आहे.

 

संजय राऊतांचं ट्वीट

कल शाम चार बजे शिवसेना भवन में प्रेस कॉन्फ्रेंस करूँगा।

जय महाराष्ट्र! pic.twitter.com/cGyOHaGGg4

— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022

संजय राऊत यांनी ट्विट करत सांगितले आहे की, “उद्या संध्याकाळी ४ वाजता आम्ही शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत आहोत.या पत्रकार परिषदेकडे लक्ष राहू द्या, जय महाराष्ट.”

 

संजय राऊत नेमकं काय बोलणार?

  • केंद्रीय यंत्रणांकडून त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करण्यात येतोय असा दावा करत संजय राऊत यांनी त्यांच्याकडील पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्याचं म्हटलं होतं.
  • यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं संजय राऊत म्हणाले होते.
  • संजय राऊतांनीही पत्रकार परिषदेत पंतप्रधान कार्यालयाकडे दिलेले पत्र सादर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यात ईडी अधिकाऱ्यांची नावे उघड करण्याची शक्यता आहे.
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
  • त्यावरही संजय राऊत बोलण्याची शक्यता आहे.
  • शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरु होता.
  • त्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

Tags: sanjay rautShivsenaShivsena Bhaपत्रकार परिषदशिवसेनाशिवसेना भवनसंजय राऊत
Previous Post

#मुक्तपीठ LIVE महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधानसभा

Next Post

स्वरा भास्कर, हुमा कुरेशी यांसह ३५ महिलांना राज्यपालांच्या हस्ते पॉवरफुल वूमेन ऑफ द इअर पुरस्कार

Next Post
Governor Koshyari felicitates 'Powerful Women of the Year' 3

स्वरा भास्कर, हुमा कुरेशी यांसह ३५ महिलांना राज्यपालांच्या हस्ते पॉवरफुल वूमेन ऑफ द इअर पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!