मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना भवनात दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. याआधीही राऊतांनी १५ फेब्रुवारीला शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपासह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते.संजय राऊतांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या हे होते. त्यामुळं आज चार वाजता ते कुणाचे बारा वाजवणार हा चर्चेचा विषय झाला आहे. राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र देत काही ईडी अधिकाऱ्यांच्या वसुली रॅकेटबद्दल पुरावे सादर केले होते. आता ते पत्रही पत्रकार परिषदेत उघड केले जाईल. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवांनंतर आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरीही आयकर धाड सुरु आहे. त्यावरही ते बोलण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांचं ट्वीट
कल शाम चार बजे शिवसेना भवन में प्रेस कॉन्फ्रेंस करूँगा।
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/cGyOHaGGg4
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022
संजय राऊत यांनी ट्विट करत सांगितले आहे की, “उद्या संध्याकाळी ४ वाजता आम्ही शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत आहोत.या पत्रकार परिषदेकडे लक्ष राहू द्या, जय महाराष्ट.”
संजय राऊत नेमकं काय बोलणार?
- केंद्रीय यंत्रणांकडून त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करण्यात येतोय असा दावा करत संजय राऊत यांनी त्यांच्याकडील पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्याचं म्हटलं होतं.
- यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं संजय राऊत म्हणाले होते.
- संजय राऊतांनीही पत्रकार परिषदेत पंतप्रधान कार्यालयाकडे दिलेले पत्र सादर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यात ईडी अधिकाऱ्यांची नावे उघड करण्याची शक्यता आहे.
- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
- त्यावरही संजय राऊत बोलण्याची शक्यता आहे.
- शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरु होता.
- त्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.