Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘भाजपा – ईडी वसुली सिंडिकेट’चा आरोप, संजय राऊतांनी पीएमओला पाठवली कागदपत्र!

भाजपाला करुन दिली राज्याकडेही तपास यंत्रणा असल्याची आठवण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut ed

मुक्तपीठ टीम

आतापर्यंत भाजपाचे नेते हे केंद्रीय यंत्रणेकडे विरोधी पक्षातील नेत्यांचे पुरावे देत कारवाईची मागणी करत होते. आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी सुद्धा तीच रणनीती स्वीकारण्याचं पाऊल उचललं आहे. राऊत यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय तपास यंत्रणा मिळून गुन्हेगारी सिंडिकेट चालवत असल्याचे पुरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे पाठवली आहेत. ते एवढ्यावरचं थांबले नसून त्यांनी तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत. त्या महाराष्ट्रातही आहेत, असा सूचक इशाराही दिला आहे.

 

भाजपा नेते आणि केंद्रीय तपास यंत्रणेचं गुन्हेगारी सिंडिकेट

  • भाजपामधील दोन-पाच लोकांना हाताशी धरून केंद्रीय तपासयंत्रणाकडून वेगळं सिंडिकेट चालवले जात आहे.
  • याची सगळी माहिती मी पंतप्रधान कार्यालयाला दिली आहे.
  • ही माहिती राज्यातील तपास यंत्रणांनाही दिली आहे.
  • यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा आणि अन्य यंत्रणांचा समावेश आहे, त्यावर कारवाई होईलच.
  • पण शिवसेनेचा नेता आणि संसदेचा सदस्य म्हणून ही माहिती पंतप्रधान कार्यालयात पोहोचवणे माझे कर्तव्य होते.
  • ही माहिती दिल्यानंतर आता केंद्र सरकार काय कारवाई करते, ते पाहावे लागेल.
  • यापुढे मी वारंवार पंतप्रधान कार्यालयाला अशी माहिती देत राहीन.
  • त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचे केंद्रातील नेते यावर काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहावे लागेल.

 

राऊतांचा सूचक इशारा

  • केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरु आहेत.
  • खासकरुन महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया सुरू आहेत.
  • त्यातही महाराष्ट्रात जरा जास्तच सुरू आहे.
  • जे चिखल फेकत आहे, त्यांचे हातसुद्धा किती बरबटलेले आहेत, ते सुद्धा देशाला कळायला हवं.
  • त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयात मी काही पुरावे दिले आहेत.
  • हा एक रेकॉर्ड आहे, आम्ही तुम्हाला कळवल्याचा.
  • पण तुम्ही काहीच काम करत नाही.
  • मुंबई महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा यावर काम करतीलच.
  • पण केंद्रातल्या यंत्रणा काय करत आहेत, हे देखील यानिमित्तानं कळेल, असं सांगतानाच तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत, त्या महाराष्ट्रातही आहेत.

Tags: BJPEDMaharashtraPM Narendra modisanjay rautईडीपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपामहाराष्ट्रसंजय राऊत
Previous Post

राज्याचे मुख्य सचिवपदी मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती

Next Post

महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’

Next Post
Shafi Shaik 6

महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!