मुक्तपीठ टीम
आतापर्यंत भाजपाचे नेते हे केंद्रीय यंत्रणेकडे विरोधी पक्षातील नेत्यांचे पुरावे देत कारवाईची मागणी करत होते. आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी सुद्धा तीच रणनीती स्वीकारण्याचं पाऊल उचललं आहे. राऊत यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय तपास यंत्रणा मिळून गुन्हेगारी सिंडिकेट चालवत असल्याचे पुरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे पाठवली आहेत. ते एवढ्यावरचं थांबले नसून त्यांनी तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत. त्या महाराष्ट्रातही आहेत, असा सूचक इशाराही दिला आहे.
भाजपा नेते आणि केंद्रीय तपास यंत्रणेचं गुन्हेगारी सिंडिकेट
- भाजपामधील दोन-पाच लोकांना हाताशी धरून केंद्रीय तपासयंत्रणाकडून वेगळं सिंडिकेट चालवले जात आहे.
- याची सगळी माहिती मी पंतप्रधान कार्यालयाला दिली आहे.
- ही माहिती राज्यातील तपास यंत्रणांनाही दिली आहे.
- यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा आणि अन्य यंत्रणांचा समावेश आहे, त्यावर कारवाई होईलच.
- पण शिवसेनेचा नेता आणि संसदेचा सदस्य म्हणून ही माहिती पंतप्रधान कार्यालयात पोहोचवणे माझे कर्तव्य होते.
- ही माहिती दिल्यानंतर आता केंद्र सरकार काय कारवाई करते, ते पाहावे लागेल.
- यापुढे मी वारंवार पंतप्रधान कार्यालयाला अशी माहिती देत राहीन.
- त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचे केंद्रातील नेते यावर काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहावे लागेल.
राऊतांचा सूचक इशारा
- केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरु आहेत.
- खासकरुन महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया सुरू आहेत.
- त्यातही महाराष्ट्रात जरा जास्तच सुरू आहे.
- जे चिखल फेकत आहे, त्यांचे हातसुद्धा किती बरबटलेले आहेत, ते सुद्धा देशाला कळायला हवं.
- त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयात मी काही पुरावे दिले आहेत.
- हा एक रेकॉर्ड आहे, आम्ही तुम्हाला कळवल्याचा.
- पण तुम्ही काहीच काम करत नाही.
- मुंबई महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा यावर काम करतीलच.
- पण केंद्रातल्या यंत्रणा काय करत आहेत, हे देखील यानिमित्तानं कळेल, असं सांगतानाच तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत, त्या महाराष्ट्रातही आहेत.