मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापन दिन बुधवारी ९ मार्चला पुण्यात साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाषण करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचं राजकारण हे नकलावर नाही, कामावर, संघर्षावर उभं आहे. काही लोक आजारी नसतानाही सक्रिय नसतात. ईडीच्या भीतीनं आमचं काम थांबत नाही, असे टोल्यांवर टोले संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावले आहेत.
आमचं राजकारण नकलांवर नाही, कामावर आणि संघर्षावर उभं!
- नक्कल केली चांगील गोष्ट आहे.
- नक्कल मोठ्या माणसांची करतात.
- तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी स्थिती आहे.
- ईडीनं आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलेलो नाही.
- ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे.
- जे सत्य आहे त्यावर शिवसेना बोलणार डुप्लिकेट काही नाही.
- आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे.
- काही लोक आजारी नसताना ही सक्रिय नसतात.
- मुख्यमंत्र्या इतक कुणीच सक्रिय नाही, म्हणून तर राज्य पुढं चाललंय.
राज ठाकरेंनी केली संजय राऊतांची नक्कल…
- राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावेळी राज यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली.
- ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल.
- एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळं साधं व्यवस्थित बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटलं ये.
- आज.. इखे जमलेले सर्व….
- अरे आता नीट बोलत होता.
- काय प्रॉब्लेम झाला.
- डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो.
- प्रश्न बोलायचा नाही.
- आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत.
- भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे.
- ते उद्या काय शिकतील?