मुक्तपीठ टीम
भाजपा खासदार पूनम महाजन यांच्या कडक प्रत्युत्तरानंतर भाजपाला सुनावणारे ट्वीट डिलीट केल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला हिंदुत्वावरील पहिल्या निवडणुकीची आठवण करुन दिली. मुंबईतील विलेपार्लेमधील हिंदुत्वावरील पहिल्या पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेनेविरोधात होती, याची आठवण करून दिली आहे. तसेच त्यानंतरच भाजपा युतीसाठी शिवसेनेकडे आली, असेही राऊत म्हणाले. तसेच भाजपाचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची कुटुंबं सध्या भाजपात कुठे आहेत, असेही त्यांनी विचारले आहे.
मुंबईतील विलेपार्ल्यात एक पोटनिवडणूक झाली होती. त्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार केला होता. त्या पोटनिवडणुकीत काँग्रेसप्रमाणेच भाजपाही शिवसेनेच्याविरोधात होती. हिंदुत्वावरील ती पोटनिवडणूक शिवसेनेने जिंकली. सर्वांना धक्का बसला. त्यानंतर भाजपाचे नेते बाळासाहेबांकडे आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र निवडणूक लढवूया. बाळासाहेबांचा उदारपणा सारेच जाणतात. त्यांनी मान्यता दिली. त्यावेळी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे नेते होते.
डिलीट केलेल्या ट्वीटबद्दल काय?
पूनम महाजन यांच्या ट्वीटवारानंतर संजय राऊतांनी प्रमोद महाजनांबद्दलचे एक जुने ट्वीट डिलीट केले. त्यावर बोलताना संजय राऊतांनी ट्वीटमधील व्यंगचित्र पूनम महाजनांना लागले. त्यामुळे मीही अस्वस्थ झालो. महाजन कुटुंबाशी आमचं चांगलं नात होतं. तसंही ते व्यंगचित्र त्यावेळी तटस्थ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढले होते. मी काढलेले नव्हते. ते योग्य नव्हते तर ३०-३५ वर्षांपूर्वीच आक्षेप घेतला पाहिजे होता. मी ते भाजपाच्या नेत्यांना कोणी कोणाला मोठे केले, त्याची आठवण करून देण्यासाठी ट्वीट केले होते. ते डिलीट केले तरी लोकांकडे आहे. तसेच ज्यांच्याकडे जायला पाहिजे ते गेलेले आहे.
‘मुक्तपीठ’चे संपादक तुळशीदास भोईटे यांचे सरळस्पष्ट भाष्य करणारा २० डिसेंबर रोजी प्रकाशित लेख नक्की वाचा: