Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’साठी निवड!

पंतप्रधानांचा महाराष्ट्रातील विजेत्या बालकांशी संवाद, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

January 25, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Four children from Maharashtra selected for PMRBP-2022

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयंम पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले तसेच, प्रातिनिधिक बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सहा श्रेणींमध्ये देशातील २९ बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील जळगाव येथील शिवांगी काळे (६) , पुणे  येथील जुई केसकर (१५) ,मुंबई येथील जिया राय (१३) आणि नाशिक  येथील स्वयंम पाटील (१४) या बालकांचा समावेश आहे. पदक, १ लाख रूपये  आणि  प्रमाणपत्र  असे  या  पुरस्काराचे स्वरूप आहे.

                         

महाराष्ट्रातील बालकांच्या प्रतिभेचा सन्मान

जळगाव येथील शिवांगी काळे हिची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासठी  निवड झाली. लहान वयातच धाडस आणि समयसूचकतेचा परिचय देत विजेच्या धक्क्यापासून शिवांगीने आपल्या आई व बहिणीचे प्राण वाचविले.

Image

पुणे  येथील जुई केसकर  हिची  नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. जुईने पार्किन्सन रोगग्रस्तांना उपयुक्त ठरतील असे मोजे सदृष्य उपकरण तयार केले असून यास ‘जे ट्रेमर ३ जी’ असे  नाव देण्यात आले आहे.

Image

मुंबई येथील रिया राय हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. १३ वर्षीय रिया ही दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वाटर पॅरा स्विमींग आणि ओपन वाटर स्विमींग मध्ये जागतिक विक्रम प्रस्थापीत केला आहे.

Image

नाशिक येथील स्वयंम पाटील याची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. स्वयंमने वयाच्या १० व्या वर्षी ५ कि.मी. अंतर पोहून तर १३ व्या वर्षी १४ कि.मी. अंतर पोहून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

Image

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी कला व संस्कृती,शौर्य, नवसंशोधन, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा या सहा श्रेणींमध्ये ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’-२०२२ पटकाविणाऱ्या २९ बालकांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले. पुरस्कार विजेत्यांमध्ये २१ राज्य व केंद्र प्रदेशातील १५ मुले आणि १४ मुलींचा समावेश होता. या कार्यक्रमातच पंतप्रधानांनी वर्ष २०२१ च्या ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या  ३२ बालकांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले.

 

प्रधानमंत्र्यांचे मार्गदर्शन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे वर्ष २०२२ चे पंतप्रधान ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई देखील यावेळी उपस्थित होत्या.

पुरस्कार विजेत्या बालकांना देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात हा पुरस्कार मिळत असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार आयुष्यभर स्मरणात राहणार असल्याचे प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. या पुरस्कारासोबत तुम्हा सर्व बालकांवर मोठी जबाबदारी आली आहे. मित्र, कुटुंबिय, समाज अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, तेव्हा या अपेक्षांचे ओझे वाटून न घेता त्यातून प्रेरणा घ्या असेही प्रधानमंत्री म्हणाले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जळगाव येथील शिवांगी काळे हिने ‘वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने ‘नव संशोधन’ मध्ये आणि मुंबईतील जिया राय, तसेच नाशिकच्या स्वयंम पाटील याने ‘क्रीडा’ श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, स्वयम पाटील या बालकांसह देशातील ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या सर्व बालकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र ही शूरांची-वीरांची, कर्तृत्ववानांची, नवनिर्माणाचा ध्यास असलेल्यांची भूमी आहे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांनी हे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. या बालकांची कामगिरी अन्य बालकांसह सर्वांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देणारी ठरेल, असे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्या बालकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या बालकांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’चे मानकरी ठरताना प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. जळगाव येथील शिवांगी काळे हिने वीरता श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने नवसंशोधनमध्ये, मुंबईतील जिया राय तसेच नाशिकच्या स्वयंम पाटीलने क्रीडा श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ मिळवला आहे. या पुरस्कार विजेत्या बालकांमुळे महाराष्ट्राचा सन्मान वाढला आहे. या बालकांच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे, नातेवाईकांचे, मार्गदर्शकांचे, हितचिंतकांचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.


Tags: cm uddhav thackerayDeputy Chief Minister Ajit PawarjalgaonJui KeskarMaharashtramumbainashikpuneRiya RaiShivangi KaleSwayam patilजळगावजुई केसकरनाशिकपुणेप्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२महाराष्ट्रमुंबईरिया रायशिवांगी काळेस्वयंम पाटील
Previous Post

विलेपार्ल्यातील हिंदुत्वाच्या पहिल्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेविरोधात होती! त्यानंतर युतीसाठी आली! – संजय राऊत

Next Post

मुंबई शहर जिल्हा वार्षिक योजनेसाठी २५० कोटी रुपयांचा निधी

Next Post
250 cr sanctioned for Mumbai City District Annual Plan

मुंबई शहर जिल्हा वार्षिक योजनेसाठी २५० कोटी रुपयांचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!