Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुंडल्या काढायचं म्हणताय, आम्ही संदुक उघडू…संजय राऊतांचं राणेंना प्रत्युत्तर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut (3)

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पु्न्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि नेत्यांची सगळी प्रकरणं मी हळूहळू बाहेर काढतो, असा उघड इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यावर आज तुम्ही आमच्या कुंडल्या काढायचं म्हणताय, आम्ही संदुक उघडू, तेव्हा तुमची पळता भुई थोडी होईल, असा इशारा संजय राऊतांनी राणेंना दिला आहे.

तुम्हाला कुंडल्या नाहीत का…?- राऊत

  • मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. तिथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राणेंवर हल्लाबोल केला.
  • राऊत म्हणाले की, ते म्हणतात तुमच्या कुंडल्या काढू, मग आम्ही त्यांना विचारतो, तुम्हाला कुंडल्या नाहीत का…?
  • आम्ही तुमचे संदुक उघडलं तर काय बाहेर पडेल हे लक्षात ठेवा.
  • बोलताना जरा जपून बोला.
  • जठार छत्रपती संभाजी महाराजांची राणेंशी तुलना करतात.
  • ज्यांनी राणेंच्याविरोधात आयुष्य घालवलं.
  • सेनेतून अनेक जण गेले.
  • पण उध्दवजींनी सांगितलंय की, वेडंवाकडं केलं तर सोडणार नाही.

 

भविष्यात नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणार आहे.

  • देशात गेल्या ८ दिवसांपासून नाशिकचं नाव गाजतंय.
  • नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाला तेव्हा मी भुवनेश्वरला होतो.
  • नाशिक देवभूमी आहे, भुवनेश्वरही देवभूमी.
  • दुसऱ्या दिवशी नाशिकने देशात वादळ उठवलं आणि आजही ते सुरू आहे.
  • आता कानफडात वाजवण्याची भीती वाटते.गुन्हा दाखल करण्याच्या हिंमतीचं काम नाशिकमध्येच होऊ शकतं, हे मला माहिती होतं.
  • ज्या हिमतीने तुम्ही ही लढाई लढता आहात, त्यासाठीच मी नाशिकला आलोय.
  • भविष्यात नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणार आहे.

 

“राणेंचा भाजपला मोठा फटका बसणार”

  • काही जण जनआशीर्वाद यात्रा काढतात तर काही येड्याची जत्रा काढतात.
  • केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांनीही शांतपणे जनआशीर्वाद यात्रा काढली.
  • देशातील ३६ मंत्र्यांनीही शहाण्याप्रमाणे यात्रा काढली. पण एक अतिशहाणा आहे, ज्याने केंद्र सरकार, मोदी यांच्या कामाचा प्रचार केला नाही.
  • नारायण राणे आणि सध्या ते ज्या पक्षात आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे.
  • राणे जेव्हापासून भाजपात गेले तेव्हापासून भाजप रोज दहा फूट मागे जातोय.
  • एक दिवस असा येईल की भाजप अर्ध्या फुटावर जाणार.
  • नारायण राणेंचा भाजपला मोठा फटका बसणार.”

 

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

  • भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहीत आहेत.
  • सर्व जुनी प्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार,
  • आवाज खणखणीत झाला की खणखणीत वाजवणार.
  • आता जुन्या गोष्टी काढणार आहोत.
  • काढा ना… दोन वर्षे झाली. शोधत आहेत. काढत आहेत. काढाना… आम्हालाही जुन्या गोष्टी माहीत आहे.
  • सुशांतची केस संपली नाहीये.
  • दिशा सालीयनचीही केस संपली नाही.
  • मी केंद्रात मंत्री आहे.
  • जरा आठवण करा.
  • रिस्ट्रिक्शन देऊन काय करणार. अटक?
  • किती दिवस. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, असं दमच राणेंनी भरला.

Tags: Narayan ranenashiksanjay rautShivsenaनारायण राणेनाशिकशिवसेनासंजय राऊत
Previous Post

तुम्ही व्यायाम करत नसाल तर प्रोटीन सप्लिमेंट्सची खरोखरच गरज आहे का?

Next Post

यूट्यूबने डिलीट केलेत १० लाख व्हिडीओ! काय आहे कारण समजून घ्या!

Next Post
youtube

यूट्यूबने डिलीट केलेत १० लाख व्हिडीओ! काय आहे कारण समजून घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!