मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पु्न्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि नेत्यांची सगळी प्रकरणं मी हळूहळू बाहेर काढतो, असा उघड इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यावर आज तुम्ही आमच्या कुंडल्या काढायचं म्हणताय, आम्ही संदुक उघडू, तेव्हा तुमची पळता भुई थोडी होईल, असा इशारा संजय राऊतांनी राणेंना दिला आहे.
तुम्हाला कुंडल्या नाहीत का…?- राऊत
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. तिथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राणेंवर हल्लाबोल केला.
- राऊत म्हणाले की, ते म्हणतात तुमच्या कुंडल्या काढू, मग आम्ही त्यांना विचारतो, तुम्हाला कुंडल्या नाहीत का…?
- आम्ही तुमचे संदुक उघडलं तर काय बाहेर पडेल हे लक्षात ठेवा.
- बोलताना जरा जपून बोला.
- जठार छत्रपती संभाजी महाराजांची राणेंशी तुलना करतात.
- ज्यांनी राणेंच्याविरोधात आयुष्य घालवलं.
- सेनेतून अनेक जण गेले.
- पण उध्दवजींनी सांगितलंय की, वेडंवाकडं केलं तर सोडणार नाही.
भविष्यात नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणार आहे.
- देशात गेल्या ८ दिवसांपासून नाशिकचं नाव गाजतंय.
- नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाला तेव्हा मी भुवनेश्वरला होतो.
- नाशिक देवभूमी आहे, भुवनेश्वरही देवभूमी.
- दुसऱ्या दिवशी नाशिकने देशात वादळ उठवलं आणि आजही ते सुरू आहे.
- आता कानफडात वाजवण्याची भीती वाटते.गुन्हा दाखल करण्याच्या हिंमतीचं काम नाशिकमध्येच होऊ शकतं, हे मला माहिती होतं.
- ज्या हिमतीने तुम्ही ही लढाई लढता आहात, त्यासाठीच मी नाशिकला आलोय.
- भविष्यात नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणार आहे.
“राणेंचा भाजपला मोठा फटका बसणार”
- काही जण जनआशीर्वाद यात्रा काढतात तर काही येड्याची जत्रा काढतात.
- केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांनीही शांतपणे जनआशीर्वाद यात्रा काढली.
- देशातील ३६ मंत्र्यांनीही शहाण्याप्रमाणे यात्रा काढली. पण एक अतिशहाणा आहे, ज्याने केंद्र सरकार, मोदी यांच्या कामाचा प्रचार केला नाही.
- नारायण राणे आणि सध्या ते ज्या पक्षात आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे.
- राणे जेव्हापासून भाजपात गेले तेव्हापासून भाजप रोज दहा फूट मागे जातोय.
- एक दिवस असा येईल की भाजप अर्ध्या फुटावर जाणार.
- नारायण राणेंचा भाजपला मोठा फटका बसणार.”
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
- भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहीत आहेत.
- सर्व जुनी प्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार,
- आवाज खणखणीत झाला की खणखणीत वाजवणार.
- आता जुन्या गोष्टी काढणार आहोत.
- काढा ना… दोन वर्षे झाली. शोधत आहेत. काढत आहेत. काढाना… आम्हालाही जुन्या गोष्टी माहीत आहे.
- सुशांतची केस संपली नाहीये.
- दिशा सालीयनचीही केस संपली नाही.
- मी केंद्रात मंत्री आहे.
- जरा आठवण करा.
- रिस्ट्रिक्शन देऊन काय करणार. अटक?
- किती दिवस. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, असं दमच राणेंनी भरला.