मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजी छत्रपतींच्या भूमिकेशी महाराष्ट्रातील सर्वच नेते सहमत असल्याचे म्हटले आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यासाठी सर्वच नेत्यांनी मोदींनी भेटले पाहिजे, असेही ते म्हणालेत.
खासदार संभाजी छत्रपतींशी सर्व सहमत!
• खासदार संभाजी छत्रपती यांच्या मताशी महाराष्ट्रातील प्रत्येक नेता सहमत आहे.
• सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे.
• कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावीत.
सर्वात महत्वाची भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच!
• खासदार संभाजी छत्रपती हे महाराष्ट्रातील सन्माननीय नेते आहेत.
• ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.
• खासदार संभाजी छत्रपतींचा संताप आणि भूमिका सरकारने समजून घेण्याची गरज आहे.
• सरकार समजूनही घेत आहे. संभाजीराजे सर्वांना भेटले.
• ते मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंना भेटले. राष्ट्रवादीचे शरद पवार, महसूल मंत्री काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनाही भेटले.
• सर्वात महत्वाची भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच असायला हवी.
• हा प्रश्न आता राज्याच्या हातात राहिलेला नाही. तो केंद्राकडे गेला आहे.