मुक्तपीठ टीम
गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात १०२ दिवस तुरुंगात काढल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत जामिनावर बाहेर आले आहेत. मात्र असं असताना, त्यांची संकटं संपलेली नाहीत. ईडीने जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केली, परंतु उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे.असं असताना संजय राऊत यांनी ईडीवर आरोप केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात केवळ विरोधी पक्षातील नेत्यांची नावे का आली? भाजपाचे नेते किंवा ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहेत त्यांच्यावर का कारवाई होत नाहीत.
माझ्यावर आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात:
- राऊत पुढे म्हणाले की, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राहुल आणि सोनिया गांधी यांसारख्या काही लोकांवर मनी लाँड्रिंगचे गुन्हे दाखल केले.
- परंतु त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे.
- माझ्यावर असे खोटे गुन्हे वारंवार दाखल होतील, हे मला माहीत आहे, पण आपण एकत्र राहून हा लढा दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
भाजपा सत्तेचा गैरवापर करतेय-
- राऊत यांनी भाजपावर सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे.
- भाजपाने विरोधी नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती थांबवली पाहिजे.
- माझं काही चुकलं असेल, तर तुम्ही माझ्याशी लढा.
- पण माझ्यामागे येऊ नका कारण मी लेखक आहे, संपादक आहे आणि मी खरे मुद्दे लोकांसमोर आणतो.” संजय राऊत हे दै. सामनाचे संपादक आहेत.