मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातलं राजकारण हादरलं आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदार आपल्या सोबत असून हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पडणार का या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गेले काही दिवस दिल्लीतील बैठका वाढल्या आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना या सर्व गोंधळात पडू नका, नाहीतर पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल असा इशारा देत शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनाही बजावलं आहे.
शिवसैनिक फक्त आदेशाची वाट पाहात आहेत…
- संजय राऊतांनी यावेळी शिवसेना कुणीही इतक्या सहज हायजॅक करू शकत नाही, असं सुनावलं.
- या पक्षाला उभं करण्यात आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे.
- बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, सगळे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली आहे.
- हा पक्ष इतक्या सहज कुणी हायजॅक करू शकत नाही.
- विचारही करू शकत नाही.
- आमच्या रक्ताने हा पक्ष तयार झाला आहे.
- शेकडो लोकांनी या पक्षासाठी बलिदान दिलं आहे.
- फक्त पैशाच्या जौरावर कुणी पक्ष खरेदी करू शकत नाही.
- आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत यावर चर्चा होईल.
- सध्याच्या संकटाला आम्ही संकट मानत नाही तर पक्षविस्ताराची संधी मानतो.
- महाशक्ती म्हणवणारा राष्ट्रीय पक्ष कुणाच्या पाठिशी आहे म्हणून कुणाला हा पक्ष हायजॅक करता येणार नाही.
- बाळासाहेब ठाकरेही म्हणायचे की हजारो शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत म्हणून मी शिवसैनिक आहे.
- आज हे हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहेत.
- सांगलीतले शिवसैनिक इथे आले आहेत.
- फक्त आदेशाची वाट पाहात आहेत. ते भडकले तर आग लागेल.
देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचा इशारा!
- देवेंद्र फडणवीसांना मी एक सल्ला देईन.
- तुम्ही या गोंधळात पडू नका.
- पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल.
- तुमची जी काही शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका, फसाल. आमचं आम्ही बघून घेऊ.