मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेना नेते संजय राऊत आता राणेंना प्रत्युत्तर देण्यासाठी सरसावले आहेत. यावेळी त्यांनी नारायण राणेंच्या महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणून राणेंनी देश समजून घ्यावा, असा सल्ला दिला. तसेच देशाच्या त्रिशुळातील एक असणाऱ्या बंगालाचे टोक तुमच्यात घुसले हे विसरु नका, असा टोलाही लगावला आहे.
संजय राऊतांचे राणेंना प्रत्युत्तर
- शिवसेना नेते संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून घाईघाऊने मुंबईत आले आहेत.
- यावेळी त्यांनी विमानतळावरच मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं.
- त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
- महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही म्हणजे काय? पश्चिम बंगालमध्ये तुमचा पराभव झाला लक्षात घ्या.
- पश्चिम बंगालमधून पळून जावं लागलं तुम्हाला.
- आणि अशी भाषा वापरत असाल तर…महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्हाला पश्चिम बंगालसारखं नामशेष केलं जाईल.
हा देश तुम्हाला माफ करणार नाही!
- पश्चिम बंगाल हा देशाचा भाग आहे.
पश्चिम बंगाल ही क्रांतिकारकांची भूमी आहे. - लाल-बाल-पाल हा त्रिशूळ जो आहे, त्यातील त्रिशूळाचं एक टोक हे बंगालचं आहे लक्षात घ्या.
- आणि त्याच त्रिशूळाचं टोक हे तुमच्यात घुसलेलं आहे.
- हे पण विसरु नका.
- एखादा राज्याचा असा अपमान कराल.
- हा देश तुम्हाला माफ करणार नाही.
- तुम्ही केंद्रीय मंत्री आहात तुम्ही देश समजून घ्या.
- आणि मग तुम्ही राजकारणावर बोला.
केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही!
- काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण?
- आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं ते.
- कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाही.
- केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही.
- आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू.
- राष्ट्रपतींशी बोलू, असं सांगतानाच कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिल्याच पाहिजे असं नाही.
- आमच्याकडे कामं आहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केलं?
- मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
- कुणी काय म्हटलं मला माहीत नाही.
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
- तोपर्यंत तुम्ही झोपले होते का?
- तेव्हा ते विधान आक्षेपहार्य वाटलं नव्हतं का?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केलं?
- छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं.
- भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे.
- आम्हाला नाही चांगलं वाटलं म्हणून आम्ही त्यावर बोललो.
- चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही.
- हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे.
- भाजपमध्ये जे लोक नवे गेले आहे त्यांना तसं वाटत असेल तर ठिक आहे, तसं जाहीर करावं.
बाळासाहेबांचे उपकार मानले पाहिजे
- बाळासाहेबांचे उपकार मानले पाहिजे.
- शिवसेनेचे उपकार मानले पाहिजे.
- आमच्या सारख्या सामान्य माणसांना बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर बसवले आहे.