Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवारांना खुर्ची दिल्यामुळे संजय राऊत लक्ष्य! संतापलेल्या राऊतांचं प्रत्युत्तर!

December 9, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
raut gave chair to pawar

मुक्तपीठ टीम

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १२ खासदारांचं निलंबन करण्यात आल्याने विरोधकांकडून संसदेच्या आवारात निदर्शन केली जात आहेत. या खासदारांना राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांना बसवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून विरोधकांनी संजय राऊतांना चांगला टोला लगावला आहे. यावरून संजय राऊतांनीही पलटवार करत भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.

 

अतुल भातखळकरांचा टोला

  • नवी दिल्लीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.
  • या फोटोवरुन काही लोकांनी संजय राऊतांवर टोलेबाजी केली होती.
  • ‘धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा.
  • आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू.
  • पण खरे गुरू शरद पवारच’, असं ट्विट करत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावलाय.

धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते @PawarSpeaks गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच. pic.twitter.com/dnePHj6B5e

— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 8, 2021

नितेश राणेंची टीका

  • संजय राऊत खुर्ची उचलताना कसलंही आश्चर्य वाटलं नाही.
  • कारण, शिवसेनेची जी अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करुन ठेवली आहे, ती खुर्ची उचलण्यापेक्षा जास्त चांगली नाही.
  • कधी राहुल गांधी, सोनिया गांधी यांना भेटणं, कधी प्रियंका गांधी यांची भेट घेण्यासाठई धावपळ करणं, यापेक्षा संजय राऊत यांनी एकदाच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करावा.
  • जेणेकरुन यूपीएमध्ये जाण्याचं कष्टही वाचेल.
  • तसेच निलेश राणे यांनी ट्विट करत ‘पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख’, असा टोला लगावला आहे.

 

पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख. pic.twitter.com/NNg2wzUotz

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 8, 2021

संजय राऊतांचा पलटवार

  • शरद पवार यांची प्रकृती त्यांना होणारा त्रास जास्त आहे.
  • आपण बसतो तसं त्यांना खाली बसता येत नाही.
  • म्हणून त्यांना खुर्ची आणून दिली.
  • लालकृष्ण अडवाणी, मुलायम सिंह यादव, मुरली मनोहर जोशी असे नेते जरी असते तरी मी खुर्ची आणून दिली असती.
  • हे राजकीय विरोधक जरी असले तरी ती पितृतूल्य व्यक्तिमत्व आहेत.
  • ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोरही उभं केलं नाही. त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नये, असं राऊत म्हणाले.
  • बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत.
  • आणि त्यांनी मला हा संस्कार दिला आहे.
  • मोठ्यांचा आदर करावा.
  • प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही.
  • हे या *** लोकांना कळत नाही.
  • ही *** बंद करा.
  • अशानं तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही.
  • हा तुमच्या डोक्यातील कचरा आहे.
  • हा कचरा जर तुम्ही साफ केला नाही तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील.
  • हे मी तुम्हाला ऑनरेकॉर्ड सांगतोय.
  • मोठ्या लोकांना बसायला खुर्ची देण्यानं जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याच अधिकार नाही.
  • वडिलधाऱ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.

Tags: sanjay rautsharad pawarWinter Sessionशरद पवारसंजय राऊतहिवाळी अधिवेशन
Previous Post

नौदल सोहळ्यात ‘सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा’ गुंजले…उपस्थित हेलावले!

Next Post

कोरोनात विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी महिला आयोग प्रयत्न करणार : रुपाली चाकणकर

Next Post
widow Women's

कोरोनात विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी महिला आयोग प्रयत्न करणार : रुपाली चाकणकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!