Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फोन टॅपिंग चौकशीसाठी संजय पांडे समिती, एक चौकशी – लक्ष्य दोन पक्षी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
phone tapping

मुक्तपीठ टीम

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना राज्यातील अनेक राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवला गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीच्या चौकशीतून आघाडी सरकारचे दोन हेतू साध्य होण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग बेकायदेशीर असल्याचं सिद्ध झालं तर भाजपाला धक्का देतानाच भाजपाशी राजकीय निष्ठा बाळगून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही इशारा देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान दिले होते.

एक चौकशी, लक्ष्य दोन पक्षी!

  • आघाडी सरकारने घेतलेला चौकशीचा निर्णय हा राजकीय फायद्याचाही मानला जात आहे.
  • फोन टॅपिंग प्रकरणाच्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री होते.
  • त्यामुळे जर बेकायदेशीर काही असेल तर अंतिमत: जबाबदारी त्यांचीच असणार, असे दाखवले जाऊ शकते.
  • फोन टॅपिंगसाठी काम करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे नियमांबाहेर जाऊन तत्कालिन सत्ताधाऱ्यांसाठी काम करत होते, असा आरोप आहे.
  • त्यामुळे त्यांनी पटोले यांनी आरोप केला तसा बनावट नावे देत नेत्यांचे फोन टॅप केले.
  • त्यावेळी व्हॉट्सअप टॅप करण्यासाठी इस्त्रायलहून खास पेगासिस सॉफ्टवेअर आणले गेले असाही आरोप झाला होता.
  • महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील काही भाजपाशी इमान राखून काम करणाऱ्यांनाही कडक इशारा देण्याचा दुसरं लक्ष्यही या चौकशीतून साध्य करण्याचा हेतू दिसत आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडेची समिती चौकशी करणार

• राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक संजय पांडे हे चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत.
• त्यांच्यासह आणखी दोन सदस्य असतील.
• मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्याविरोधातील भाजपेतर आणि भाजपातील काही नेत्यांशी संबंधित फोन टॅप केल्याचा आरोप आहे.
• विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमकतेनं हा विषय लावून धरला.
• सत्ताधारी सदस्यांच्या दबावामुळे अखेर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
• त्यानुसार ही समिती आता तपास करणार आहे.
• भाजपा सत्ताकाळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी ही त्रिसदस्यीय समिती करणार आहे.
• चौकशीनंतर तीन महिन्यात चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.
• २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीतील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

नाना पटोलेंनी टॅपिंगवर उठवला आवाज

• पावसाळी अधिवेशनात फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा गाजला.
• काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला.
• फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले.
• कळू नये यासाठी पटोलेंचा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप करण्यात आला.
• अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून पटोलेंचा फोन टॅप करण्यात आला.
• नंबर पटोलेंचा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लिम नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय?
• आणखीही काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले.
• अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.
• लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा कट आहे, असा गंभीर आरोपही नाना पटोलेंनी सभागृहात केला होता.

गृहमंत्र्यांनी दिले होते चौकशीचे आश्वासन

• सभागृहातील सत्ताधारी सदस्यांचा संताप पाहून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचं आश्वासन दिलं होतं.
• फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
• फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल.
• गृह खात्यातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याची माहिती घेऊ, असे आश्वासन वळसे पाटील यांनी सभागृहाला दिले होते.

एक चौकशी, लक्ष्य दोन पक्षी!

  • आघाडी सरकारने घेतलेला चौकशीचा निर्णय हा राजकीय फायद्याचाही मानला जात आहे.
  • फोन टॅपिंग प्रकरणाच्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री होते.
  • त्यामुळे जर बेकायदेशीर काही असेल तर अंतिमत: जबाबदारी त्यांचीच असणार, असे दाखवले जाऊ शकते.
  • फोन टॅपिंगसाठी काम करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे नियमांबाहेर जाऊन तत्कालिन सत्ताधाऱ्यांसाठी काम करत होते, असा आरोप आहे.
  • त्यामुळे त्यांनी पटोले यांनी आरोप केला तसा बनावट नावे देत नेत्यांचे फोन टॅप केले.
  • त्यावेळी व्हॉट्सअप टॅप करण्यासाठी इस्त्रायलहून खास पेगासिस सॉफ्टवेअर आणले गेले असाही आरोप झाला होता.
  • महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील काही भाजपाशी इमान राखून काम करणाऱ्यांनाही कडक इशारा देण्याचा दुसरं लक्ष्यही या चौकशीतून साध्य करण्याचा हेतू दिसत आहे.

Tags: devendra fadanvisMaharashtranana patolesanjay pandeyगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र पोलीसव्हॉट्सअप टॅप
Previous Post

ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये १२वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी करिअर संधी

Next Post

गरोदर महिलांचं लसीकरण…तुम्हाला ठाऊक असलंच पाहिजे डॉक्टरांचा सल्ला!

Next Post
गरोदर महिलांचं लसीकरण…तुम्हाला ठाऊक असलंच पाहिजे डॉक्टरांचा सल्ला!

गरोदर महिलांचं लसीकरण...तुम्हाला ठाऊक असलंच पाहिजे डॉक्टरांचा सल्ला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!