Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सरहद’च्या संजय नहारांकडून मनसेच्या वसंत मोरेंच्या ‘शांतताप्रिय’ भूमिकेचं कौतुक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Nehra praises MNS 'Vasant More

मुक्तपीठ टीम

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून नाराज पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे एकाकी पडले आहेत. भोंग्यांच्या मुद्यावरून पक्षातून त्यांना विरोध झाला आहे. त्यांचे शहराध्यक्ष पदही गेले. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेत राहणार किंवा नाही, अशा चर्चा सातत्याने सुरु आहेत. मात्र, आपण केवळ राज ठाकरे या एका कारणासाठी मनसेत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून तरी स्पष्ट होते. त्यांच्या या भूमिकेमुळे आता सरहद्द संस्थेच्या संजय नहार यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले आहे. त्यांनी पत्र लिहून मशिदींवरील भोंग्यांबाबत वसंत मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. यासंबंधीचे पत्र वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 

सरहद या शिक्षण समूहाचे सर्वेसर्वा मा.श्री. संजय नहारसाहेब यांनी मला एक खूप अभ्यासपूर्ण पत्र दिले.
धन्यवाद साहेब … pic.twitter.com/VFkXRxewPV

— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) May 24, 2022

संजय नहार यांचं पत्र त्यांच्याच शब्दात-

दि . ०६/०५/२०२२

प्रिय वसंत तात्या मोरे,

सध्या एकूणच घडणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होऊन मी हे पत्र लिहीत आहे. तुमच्या राजकीय भूमिका काय असाव्या हा तुमचा व्यक्तिगत आणि कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे आणि मीही तुमच्या सारखाच ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मात्र सामान्य माणसासाठी आणि प्रभागात शांतता रहावी यासाठी तुम्ही घेतलेली भूमिका आणि त्याची मोजलेली किंमत यामुळे सर्वत्र अंधार नाही अशी माझी खात्री झाली आहे.

आधीच लोक एकीकडे उन्हाने तर दुसरीकडे असंख्य अडचणींनी गांजले आहेत त्यांना अस्थिर करू नये, यासाठीची तुमची तळमळ खूप महत्त्वाची वाटते. सरदार मोठा झाला तर राजा आपोआप मोठा होतो मात्र राजा मोठा आहे म्हणून सरदार मोठे होतातच असे नाही असे मला मनापासून वाटते. तुमच्यासारखे कर्तृत्ववान सरदार हीच पक्षाची, समाजाची आणि देशाची शक्ती असते. तुमच्यासारखे सरदार दुखावले जावू नये त्यांचा योग्य तो सन्मान, ‘राजा’ने, समाजाने आणि देशाने राखला पाहिजे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे कर्तृत्व सदैव उजळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

संजय नहार
संस्थापक, अध्यक्ष सरहद


Tags: mnsSanjay NaharSARHADVasant Tatya Moreमनसेवसंत मोरेसंजय नहारसरहद
Previous Post

शाहरुख खान, अजय देवगणला एका तरुणीने ‘ब्रदर्स डे’ला दिली ५ रुपयांची भेट! मागितला पान मसाला!!

Next Post

मध्य रेल्वेचा एक आठवडा ट्रॅफिक ब्लॉकचा! जाणून घ्या कुठे, कधी, कसा?

Next Post
Central railway

मध्य रेल्वेचा एक आठवडा ट्रॅफिक ब्लॉकचा! जाणून घ्या कुठे, कधी, कसा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!