मुक्तपीठ टीम
सांगली , मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची महापौरपदी तर काँग्रेसचे उमेश पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षात गेली आहे. भाजपच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान केले, तर दोघे गैरहजर राहिले.
ऑनलाईन होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी नगरसेवकांनी कोल्हापूरातून तर भाजपा नगरसेवकांनी खरे क्लब हाऊसमधून मतदान केले. सकाळी ११ वाजता कोरोनाच्या काळामुळे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. यात भाजपाची पाच मते फुटली. या पाचही नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले. गेले चार दिवस रंगलेला सदस्यांच्या फुटीचा, उमेदवारीचा सस्पेन्स दुपारी साडेबाराच्या सुमारा संपला आणि निवडणुकीचे चित्रही स्पष्ट झाले. ३९ विरुध्द ३७ मतांनी राष्ट्रवादीचे सूर्यवंशी विजयी झाले.
सांगली महापालिकेच्या महापौरपदी महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांनी ऐतिहासिक विजय मिळवत सांगलीच्या महापौरपदावर आपले नाव कोरले आहे. दिग्विजय सूर्यवंशी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन!@Jayant_R_Patil pic.twitter.com/V7iKgktzux
— NCP (@NCPspeaks) February 23, 2021
राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मतं पडली तर भाजपाच्या धीरज सूर्यवंशी यांना ३६ मतं मिळाली. दिग्विजय सूर्यवंशी यांनी धीरज सूर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला.
भाजपाचे कोण थेट राष्ट्रवादीसोबत?
• विजय घाडगे
• महेंद्र सावंत
• स्नेहल सावंत
• अपर्णा कदम
• नसीमा नाईक