Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“गदिमांच्या गावात हातातोंडाशी आलेला घास निघून चाललाय, माणसं जनावरं तडफडतायत…वाचवा!”

सांगलीच्या आटपाडीतील शेटफळे गावातील पंपांना वीज पुरवठा नाही, शेतकऱ्यांचं सरकारला साकडं

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
Aatpadi -1

शंकर रामचंद्र गायकवाड, हणमंत दिनकर गायकवाड / व्हा अभिव्यक्त

शेटफळेमधील शेतकरी शंकर रामचंद्र गायकवाड, हणमंत दिनकर गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुक्तपीठकडे व्यथा पोहचवली. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी कोरड्या रखरखाटातून सरकारला साद घालणारं व्हिडीओ निवेदन मुक्तपीठच्या विनंतीवरून पाठवले. त्यात त्यांनी जे सांगितले ते त्यांच्याच शब्दात:

 

सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा तसा नेहमीच पाण्याची वाणवा असणाराच आमचा तालुका. तरीही आम्ही शेतकरी अस्मानी अवकृपेशी झुंजत शेती पिकवतो. राबराब राबतो, घामाचं पाणी घालतो. आणि शेतात पिकाचे मोती पिकवतो. पण आता गेल्या दोन तीन दिवसांपासून आमच्या शेटफळे गावात शेतीचा पुरवठा कापण्यात आला आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांची मेहनत करपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

आमचं शेटफळे गावं तसं खूप प्रसिद्ध महान कविवर्य ग. दि. माडगुळकरांमुळे जगविख्यात झालेलं. आजही त्यांचं नाव घेतलं की आमच्या गावचा उल्लेख होतोच होतो. त्यांनी या गावात शब्दांचे मोती पिकवले. गावाचं नाव मोठं केलं. मोठं मोठी लोक तेव्हा गावात येत. आता मात्र दुर्लक्ष झालंय. गावावर, गावकऱ्यांवर साऱ्यांवरच दुर्लक्षातून अन्याय होतोय.

 

दोन तीन दिवस झालं पंपाची लाइट बंद केलेली आहे. शासनाने काही तरी दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्यांचे फक्त मरण आहे. डाळिंब बागा, जनावरं, माणसं सगळ्यांना पाणी लागतं. पाण्याविना माणसं जनावरं तडफडायला लागली.हातातोंडाशी आलेलं घास निघून चाललाय. अगोदरच हा दुष्काळी भाग. शासन दुष्काळ जाहीर करत नाही. पण आहे तेसुद्धा माणसाला पदरात पडू देईना. यासाठीच लाइट चालू करावी, शासनाला विनंती आहे.

दोन तीन दिवस झालं लाइट नाही. लाइट नसल्यानं पिण्याचा पाण्याचा सुद्धा प्रश्न झालाय. विहिरीतील पाणी काढता येत नाही. पायऱ्या नाय काय नाय त्या. महावितरणला शासनाने विनंती करावी की लाइट चालू करावी.

शेतकऱ्यांनी मुक्तपीठला पाठवलेलं व्हिडीओ निवेदन नक्की पाहा:

(ज्यांनी आपलं गाऱ्हाणं मांडलं ते शेतकरी आहेत. त्यांनी पाठवलेल्या व्हिडीओ निवेदन आणि तुळशीदास भोईटेंनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या माहितीवर वरील माहिती दिलेली आहे)

 


Tags: aatpadifarmersmadgulkarMaharashtrasangalishetfaleआटपाडीग दि माडगूळकरमहाराष्ट्रशेटफळेशेतकरीसांगली
Previous Post

सुरुवात तुम्ही केलीत शेवट आम्ही करु! भाजपा नेते ॲड आशिष शेलारांचा इशारा

Next Post

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते, पण नव्या रुग्णांचे प्रमाणही कायम!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते, पण नव्या रुग्णांचे प्रमाणही कायम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!