मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला असल्याने यंदाही एकही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही. निर्माते चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करत आहेत तर काही प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा बहुप्रतिक्षित ‘मेजर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेले एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधीरत चित्रपट आहे. येत्या २ जुलैला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. पण चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अदिवी शेष याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
पोस्ट करुन काय दिली माहिती
- अभिनेता अदिवी शेष याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्ही अशा परिस्थितीचा समाना याआधी कधीच केलेला नाही.
- अशी आशा आहे की सर्व नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करत असून सुरक्षित असतील.
- आम्हाचा ‘मेजर’ चित्रपट २ जुलैला प्रदर्शित होणार होता पण आता योग्य वेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली जाईल.
- ‘मेजर’ चित्रपटाचे प्रदर्शन होईल तो दिवस गर्वाचा दिवस असेल.
- चाला तर मग योग्य वेळेची वाट पाहूया…मी असे वचन देतो की हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
View this post on Instagram
चाहत्यांनी केली चिंता व्यक्त
- अभिनेता अदिवी शेष यांनी प्रदर्शनाच्या तारखे संबंधी माहिती दिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
- प्रदर्शनाच्या तारखेला स्थगिती दिल्याने हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ नये असे, चाहत्यांकडून मत व्यक्त होत आहेत.
- तसेच एका यूजर्सने कमेंट लिहिताना म्हटले की, प्रदर्शानाल उशीर झाला तरी चालेले पण ओटीटीवर प्रदर्शित करु नका.