मुक्तपीठ टीम
कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेध करण्यात आला आहे. मनसेनेही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उद्वव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तर थेट कानडीतूनच कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
समाजकंटकांनी रात्रीच्यावेळी पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा हा संतापजनक प्रकार सदाशिवनगर बंगळूर इथे घडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून होत आहे. यावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, म्हणजेच मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमना कदापिही सहन करणार नाही. असा इशारा सदीप देशपांडे यांनी दिला आहे. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, अदन्न नाव यावागलो, सहस्सोदिला, मानंगिला न्यूतुळकळी, असा इशारा देशपांडे यांनी कानडीतून दिला आहे. म्हणजे महाराजांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावं. कर्नाटकमध्ये दोन पक्षाचं जे अंतर्गत राजकारण सुरू आहे. त्या अंतर्गत राजकारणात महाराजांचा झालेला अपमान मराठी माणूस कधीही सहन करणार नाही हे लक्षात ठेवा. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवावा अन्यथा मनसे त्यांच्यावर कंट्रोल ठेवेल, असा इशाराही देशपांडे यांनी दिला आहे.”
या घटनेनंतर परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाले असून अनेकांनी धर्मवीर संभाजी चौकामध्ये जमून रस्ते बंद केले. दगडफेकीच्या घटनाही यावेळी समोर आल्या. त्यामुळे बेळगावमध्ये शहर बंद असल्याचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. सकाळपासूनच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहत आहेत तर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी यास पाठिंबा द्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.