मुक्तपीठ टीम
सॅमसंग म्हटलं की हमखास स्मार्टफोनच आठवतो. सॅमसंग हा एक जगविख्यात ब्रॅंड आहे. नुकतीच सॅमसंगने भारतातील तरुणांसाठी राष्ट्रीय स्तरावर नाविन्यपूर्ण स्पर्धा सुरू केली आहे, ज्यामध्ये तरुणांना गहन समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सादर कराव्या लागतील. ‘सॉल्व्ह फॉर टुमारो’ स्पर्धेच्या पहिल्या व्हर्जनची घोषणा करताना सॅमसंग इंडियाने स्पर्धेमागील भूमिका मांडली आहे. देशातील तरुणांना सामान्य लोकांच्या जीवनात क्रांती घडवून आणणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा विचार करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या वर्षी शिक्षण, पर्यावरण, आरोग्य सेवा आणि कृषी क्षेत्राशी निगडीत मूलभूत समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना मागवण्यात आल्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघानेही भारतासाठी जाहीर केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये या क्षेत्रांना प्राधान्य दिले आहे.
तीन राष्ट्रीय विजेत्यांच्या घोषणेसह वर्षभर चालणारा हा कार्यक्रम संपेल, असे सॅमसंगने जाहीर केले आहे. या तरुणांना १ कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान मिळवून त्यांच्या कल्पना पुढील स्तरावर नेण्याची संधी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असेल.
‘सॉल्व्ह फॉर टुमारो’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. स्पर्धेतील अव्वल १० रँक असलेल्या संघांना सॅमसंग इंडियाचे कार्यालय, आर अॅंड डी केंद्र आणि बंगळुरू येथील सॅमसंग ऑपेरा हाऊसला भेट देण्याचीही संधी मिळेल. तेथे हे तरुण स्पर्धक सॅमसंगचे संशोधक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधू शकतील.