Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दररोज ४५ रूपये वाचवा आणि पेन्शन मिळवा, एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
LIC Jeevan Umang Policy

मुक्तपीठ टीम

विमा हे आर्थिक संरक्षणाचे एक चांगले आधुनिक माध्यम मानले जाते. कारण विमाधारक व्यक्तीला पॉलिसीत नमूद नुकसानाच्या भरपाईची विम्यातून हमी मिळते. जीवन उमंग पॉलिसी म्हणजे ही एलआयसीची आयुष्यभराची मनी बॅक पॉलिसी आहे. जीवन आनंद योजनेव्यतिरिक्त, जीवन उमंग ही एकमेव पॉलिसी आहे जी १०० वर्षांसाठी विमा संरक्षण देते. त्यामुळे जीवन उमंग पॉलिसीबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे…

काय आहे जीवन उमंग पॉलिसी?

  • जीवन उमंग पॉलिसी ही एलआयसीची हमी दिलेली परतावा योजना आहे, ज्यामध्ये आयुष्यभरासाठी विम्याच्या रकमेच्या ८ टक्के रक्कम मिळते.
  • जिथे बँका आणि इतर वित्तीय संस्था सातत्याने व्याजदर कमी करत आहेत, त्याचवेळी जीवन उमंगकडून ८ टक्के परतावा मिळेल, तोही वयाच्या १०० वर्षापर्यंत मिळतो.

सोप्या भाषेत जीवन उमंग पॉलिसी म्हणजे, आज तुमचे वय ३० वर्षे आहे आणि तुम्ही १० लाख विम्याची जीवन उमंग पॉलिसी घेतली आहे आणि समजा, तुम्ही प्रीमियम भरण्याची मुदत २० वर्षे निवडली आहे. तुम्ही ५० वर्षांचे झाल्यावर तुमचा प्रीमियम भरणे बंद होईल आणि तुम्हाला पैसे मिळणे सुरू होईल.

तुम्हाला विम्याच्या रकमेच्या ८% रक्कम उपलब्ध असेल, अशा प्रकारे आयुष्यभर प्रतिवर्ष ८० हजार रूपये मिळणे सुरू होईल आणि तुमचे वय १०० वर्षे होईपर्यंत ते मिळेल.जीवन उमंग पॉलिसीमध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यावर मॅच्योरिटी मिळते

जीवन उमंग पॉलिसी एक पेन्शन योजना

  • जीवन उमंग पॉलिसी पेन्शन योजनेचा एक चांगला पर्याय आहे.
  • आजच्या काळात, क्वचितच कोणी वयाची १०० वर्षे पूर्ण करतो आणि त्यांना मॅच्योरिटी मिळते.
  • परंतु जोपर्यंत जिवंत आहात, तोपर्यंत दरवर्षी चांगली रक्कम मिळत राहते आणि नॉन-लाइफच्या बाबतीत, नॉमिनीला विम्याची रक्कम मिळेल. अशा प्रकारे ही एक पेन्शन योजनाच आहे.

एलआयसी जीवन उमंग पॉलिसी पात्रता

  • आता या योजनेत सामील होण्याची पात्रता काय आहे ते जाणून घेऊ.
  • जीवन उमंग पॉलिसीमध्ये सामील होण्याचे किमान ३ महिन्यापासून ते कमाल वय ५५ वर्षे आहे.
  • यामध्ये किमान विमा रक्कम १० लाख रुपये आहे आणि कमाल विमा रक्कम नाही. अशाप्रकारे, जीवन उमंग पॉलिसी पेन्शनसाठी एक चांगला पर्याय ठरेल.

पाहा व्हिडीओ:


Tags: Changeli BatamiFinancial ProtectionLIC Jeevan Umang PolicymuktpeethPension Schemeआर्थिक संरक्षणएलआयसी जीवन उमंग पॉलिसीचांगली बातमीपेन्शन योजनामुक्तपीठ
Previous Post

सॅमसंगने भारतीय तरुणांसाठी ‘सॉल्व्ह फॉर टुमारो’ या स्पर्धेचे केले आयोजन!

Next Post

सर्वोच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदाच्या २१० जागांवर संधी

Next Post
sc

सर्वोच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदाच्या २१० जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!