मुक्तपीठ टीम
सॅमसंग गॅलेक्सी S22 सिरिज स्मार्टफोनची आता ग्लोबल लाँचिंगची तयारी सुरू आहे. हा स्मार्टफोन ८ फेब्रुवारी २०२२ ला लाँच होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुम्ही एक दिवस अगोदर म्हणजेच ७ फेब्रुवारीपासून फोन प्री-बुक करू शकाल. तर फोनची शिपमेंट २४ फेब्रुवारीपासून सुरू होईल. तसेच, सॅमसंगने सॅमसंग गॅलेक्सी S22 स्मार्टफोनची अधिकृत लॉंचिंगची तारिख अजून अधिकृतरित्या उघड केलेली नाही.
स्मार्टफोनला ‘या’ चिपसेटचा मिळणार सपोर्ट
- सॅमसंग गॅलेक्सी S22 सिरीज अंतर्गत तीन मॉडेल्स येणार असल्याची माहिती उघड झालेली आहे.
- सॅमसंग गॅलेक्सी S22, सॅमसंग गॅलेक्सी S22 प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा असू शकतात.
- हे तिन्ही स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ८ जेन १ चिपसेटसह सादर केले जाऊ शकतात. परंतु असं म्हटलं जात आहे की, सॅमसंग हे सर्व स्मार्टफोन इन-हाउस Exynos २२०० चिपसेट सपोर्टसह देऊ शकते.
सॅमसंग गॅलेक्सी S22 मॉडेलमध्ये काय फरक असणार?
सॅमसंग गॅलेक्सी S21 एफई ५जी स्मार्टफोन Exynos २१०० चिपसेट सपोर्टसह भारतात लॉंच करण्यात आला आहे. तर, जागतिक बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी S21 एफई ५जी साठी स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी S22चे आधुनिक फिचर्स
- सॅमसंग गॅलेक्सी S22 सिरीज स्मार्टफोनमध्ये एस पेन सपोर्ट दिला जाईल.
- फोन आयपी६८-रेटेड केलेल्या आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरच्या सपोर्टसह येईल.
- सॅमसंग गॅलेक्सी S22 स्मार्टफोन ६.१ इंच आणि S22+ ६.५५ इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्लेसह येईल.
- S22 अल्ट्राला ६.८ इंचाचा क्यूएचडी + AMOLED डिस्प्ले मिळेल.
- फोनला १२०एचझेड रिफ्रेश रेट, एचडीआर१० + सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षण मिळेल.
- सॅमसंग गॅलेक्सी S22 आणि S22+ ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतील. त्याचा मुख्य कॅमेरा ५० एमपी असेल. याशिवाय १२एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स आणि १२एमपी टेलिफोटो लेन्स दिले जाऊ शकतात.
- S22 अल्ट्रामध्ये १०८एमपी मुख्य कॅमेरा असेल.
- याशिवाय, १२एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर, १०एमपी टेलिफोटो लेन्स आणि १०एक्स ऑप्टिकल झूमसह १०एमपी पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स दिले जाईल.
- सॅमसंग गॅलेक्सी S22ला ४,०००एमएएच आणि सॅमसंग गॅलेक्सी S22 प्लसला ४,५००एमएएच बॅटरी मिळेल. तर S22 अल्ट्रामध्ये ५,०००एमएएच बॅटरी सपोर्ट मिळू शकते.