Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

संविधान दिनी गडकरी रंगायतनमध्ये नाटक ‘सम्राट अशोक’ चा प्रयोग!

November 24, 2021
in घडलं-बिघडलं, विशेष
0
samrat ashok drama on constitution day

मुक्तपीठ टीम

२६ जानेवारी, १९५० रोजी संविधानाचा अवलंब करून, भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयास आला. जगाने भारताच्या सार्वभौमिकतेला सलाम केले. भारतात प्रथमच जनतेला देशाचा मालक होण्याचा संविधानात्मक हक्क मिळाला. संविधान म्हणजे सम+विधान म्हणजे सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला. संविधानात सर्वांना समान हक्क देऊन भारत गुलामगिरीच्या शापापासून प्रशासकीयदृष्ट्या मुक्त झाला. संविधानाच्या बळावर जातीभेद, शोषण, अन्याय, हिंसाचाराच्या क्रूर अत्याचारापासून मुक्तता आणि मानव अधिकाराच्या नव्या युगात भारताने प्रवेश केला.

 

समाजातील विविध असमानतेविरुद्ध सरकारने लढा दिला आणि एक ‘मानवीय आणि सहिष्णु’ समाज घडविण्यासाठी कार्य केले. भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी अशोक स्तंभाला आपल्या शासनाची ‘राजमुद्रा’ बनविले. सम्राट अशोकच्या सर्वधर्म समभाव नीतीला भारतीय संविधानाचा आत्मा म्हणून स्वीकारले.

 

भारतातील मूलभूत तत्व ‘लोककल्याण आणि धर्मनिरपेक्षता’ सम्राट अशोकाच्या नितींमधून घेतलेले तत्व आहेत. सम्राट अशोकाने भारताला दिलेला हा वारसा आहे, ज्याच्या पायावर आजचा स्वतंत्र भारत उभा आहे.

 

१९९० च्या जागतिकीकरणाच्या विध्वंसक काळाने केवळ जगाचा नाश नाही केला तर भारतीय संविधानातील मूलभूत तत्वांनाही आव्हान दिले. भारतातील आर्थिक भरभराटीतून जन्माला आलेला नवीन मध्यमवर्ग लोभाच्या घोडयावर स्वार होऊन विकासाच्या जाळ्यात फसला आहे. धार्मिक कट्टरतावाद, जातीवाद आणि हिंसाचार आज शिगेवर पोहचले आहेत.

 

कोणत्याही किंमतीवर निवडणुका जिंकणे हे एक मोठा नेता असल्याचे प्रमाणपत्र बनले आहे. अशा आव्हानात्मक काळात नाटककार धनंजय कुमार यांनी विकारवादाशी एकहात करण्यासाठी सम्राट अशोकाला इतिहासाच्या पानांमधून सम्राट अशोकाला बाहेर काढून आमच्या समोर नाटकाच्या रूपात जिवंत केले. ‘सम्राट अशोक’ हे नाटक कलिंग विजयानंतर अशोकमध्ये झालेल्या मुळगामी परिवर्तनाची गाथा आहे. हिंसक अशोकाचा अहिंसक होण्याचा प्रवास आहे. लालसाग्रस्त, एकाधिकारवादी अशोकाने लोकशाही मूल्यांना आपलंसं करण्याचा एल्गार आहे. ‘प्रजा कल्याण हा शासनाचा मूळ आधार असावा’ हा उद्घोष आहे.

 

रंगचिंतक मंजुल भारद्वाज अभिनित आणि दिग्दर्शित धनंजय कुमार यांच्या कालजयी नाट्यरचनेला आपल्या कलात्मकतेने साकारणार आहेत,अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे आणि इतर कलाकार.

 

२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त गडकरी रंगायतन, ठाणे येथे सकाळी ११.३० वाजता नाटक ‘सम्राट अशोक’ प्रस्तुत होणार आहे.  परिवर्तनाला उत्प्रेरीत करत मागील २९ वर्षांपासून ” थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताने सतत सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदाना शिवाय आपली प्रासंगिकता आणि आपली मूल्य व कलात्मकतेच्या संवाद स्पंदनांनी मानवतेची गाज असणाऱ्या या जनमंचाने जागतिक रूप धारण केले आहे. सरकारच्या ३०० ते १००० करोडच्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेटच्या विरुद्ध प्रेक्षक सहभागितेने उभे आहे हे रंग आंदोलन … मुंबई पासून मणिपूर पर्यंत!

 

थिएटर ऑफ रेलेवन्स ने जीवनाला नाटकाशी जोडून “मागील २९ वर्षांपासून सांप्रदायिक मुद्द्यावर ‘दूर से किसी ने आवाज़ दी’, बाल मजुरी वर ‘मेरा बचपन’, घरगुती हिंसेवर ‘द्वंद्व’, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत अर्ध्या लोकसंख्येचा आवाज ‘मैं औरत हूँ’ , ‘लिंगनिदान’ या विषयावर नाटक ‘लाडली’ , जैविक आणि भौगोलिक विविधतेवर “बी-७” , मानवता आणि निसर्गाच्या प्राकृतिक संसाधनांच्या खासगीकरणाच्या विरोधात “ड्राप बाय ड्राप : वॉटर”, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी “गर्भ” , शेतकऱ्यांची  आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावर ‘किसानों का संघर्ष’ , कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक “अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स” , शोषण आणि दमनकारी पितृसत्ततेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार “न्याय के भंवर में भंवरी” , समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी ‘राजगति’, समतेचा एल्गार “लोकशास्त्र सावित्री”. भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांचे संरक्षण करण्याचा संकल्प करणारे धनंजय कुमार लिखित कालातीत नाटक ‘सम्राट अशोक’ ! नाटकांच्या माध्यमातून वर्चस्ववादी ताकदींशी लढत आहे !

 

कला नेहमी परिवर्तनाला उत्प्रेरीत करते. कारण कला मनुष्याला मनुष्य बनवते. जेव्हा विकार मनुष्याच्या आत्महीनतेमध्ये झिरपू लागतो तेव्हा त्याच्या आत  समाविष्ट असलेला कला भाव त्याला चेतावणी देतो.

 

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत अपल्या रंग आंदोलनातून मागील २९ वर्षांपासून देशात आणि जगभरात आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेने हे सचेतन कलात्मक कर्म करत आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सचे प्रतिबद्ध कलाकार समाजातील फ्रोजन स्टेटला तोडून सांस्कृतिक चेतना जागृत करीत आहे. थिएटर ऑफ रेलेवन्स ‘सांस्कृतिक सृजनकार’ घडवण्याचा विडा उचलत आहे! भारतीय संविधानातील मूलभूत तत्वांचे संरक्षण करण्याचा संकल्प करून प्रस्तुत करीत आहोत,धनंजय कुमार यांची कालातीत नाट्य रचना ‘सम्राट अशोक’ !!!


Tags: Constitution daydramaGadkari RangaytanManjul Bharadwajmuktpeethmumbaisamrat ashokthaneTheater of Relevanceगडकरी रंगायतानठाणेथिएटर ऑफ रेलेवन्सनाटकमंजुल भारद्वाजमुक्तपीठसम्राट अशोकसंविधान दिन
Previous Post

एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकमध्ये करिअर संधी, भारतात सॅटेलाइट इंटरनेट लाँच करणार!

Next Post

भारतात खासगी ‘क्रिप्टोकरन्सी’वर बंदी येणार! जाणून घ्या नेमकं काय घडणार?

Next Post
What will happen with cryptocurrency in India

भारतात खासगी 'क्रिप्टोकरन्सी'वर बंदी येणार! जाणून घ्या नेमकं काय घडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!