मुक्तपीठ टीम
आर्यन खान ड्रग्स प्रकरणी चर्चेत आलेले भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी समीर वानखेडे यांनी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे उपमहासंचालक (DDG) ज्ञानेश्वर सिंह यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांच्या या आरोपाची चौकशी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC) करणार आहे. कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात त्रुटी आढळल्याचं एनसीबीच्या अहवालात स्पष्ट झालं होतं. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी शिफारस करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर सिंह यांनी केला होता कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणा तपास!!
- ज्ञानेश्वर सिंह यांनी दक्षता तपासाचे नेतृत्व केले होते ज्यात २०२१ मध्ये क्रूझवर कथितरित्या जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाच्या प्रकरणात अनियमितता आढळली होती.
- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, ते ज्ञानेश्वर सिंह यांनी केलेल्या कथित छळ आणि अत्याचाराची चौकशी करेल.
- दिवाणी न्यायालयाचे अधिकार असलेल्या पॅनेलसमोर या संदर्भात तक्रार प्रलंबित राहिल्यास या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार नाही, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.
वानखेडेंच्या आरोपाचा तपास करणार एनसीएससी!!
- निवेदनात म्हटले आहे की, एनसीएससीला वानखेडे यांच्याकडून तक्रार किंवा माहिती प्राप्त झाली असून आयोगाने घटनेने दिलेल्या अधिकारांचे पालन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- वानखेडे यांनी एनसीएससीच्या अध्यक्षांचीही भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.
- आयोगाने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाला (CBIC) एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (SET) सादर केलेली मूळ कागदपत्रे तपासणीसाठी पॅनेलकडे सोपवण्यास सांगितले आहे.
सीबीआयसीला कागदपत्रे देण्याचे आदेश!!
- भारतीय महसूल सेवा (IRS) CBIC द्वारे शासित आहे.
- एनसीएससीने सीबीआयसीला ही कागदपत्रे १५ दिवसांत देण्यास सांगितले आहे.
- या प्रकरणी समीर वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी आयोगाशी संपर्क साधला आहे, मात्र हे प्रकरण विचाराधीन असल्याने मी यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही.
- ज्ञानेश्वर सिंह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान व विटंबना केली.
- मी एक वर्ष सतत छळ सहन केला.
आर्यन खान एनसीबी तपासाचा चौकशी अहवाल धक्कादायक, समीर वानखेडे पुन्हा चर्चेत!