मुक्तपीठ टीम
देशातील अनेक राज्यांनी ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा कधीच ओलांडली आहे. त्यांचे चालवून घेतले गेले. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्राने ती ओलांडताच ते आरक्षणच रद्द केले गेले. इतर राज्यांसाठी जे चालवून घेतले गेले ते महाराष्ट्रासाठी का नाही? असा रोखठोक सवाल खासदार संभाजी छत्रपती यांनी केला आहे.
महाराष्ट्राला ५० टक्के आरक्षणाची मर्यादा का ओलांडू दिला नाही यावर विचार केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो. आधीच्या सरकारने आणि आताच्या सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात चांगली बाजू मांडली. पण तरीही असा निकाल लागला, असे खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.
मराठा समाजाने कोणताही उद्रेक सध्या होऊ देऊ नये. सध्याच्या कोरोना परिस्थितीत आंदोलनासाठी रस्त्यावर येणे योग्य ठरणार नाही.