Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारनं शब्द पाळला नाही, उपोषण करावंच लागलं! – संभाजीराजे छत्रपती

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
SAMBHAJI RAJE

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे छत्रपतींनी उपोषणाला सुरुवात केली असून यासंदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून १५ दिवसात या मागण्या मंजूर करणाऱ्या सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. म्हणूनच मी आजपासून उपोषणाला बसलो आहे,असे सांगितले.

 

हिंदू-मुस्लिम, दलित-मराठा, ओबीसी-मराठा वाद होण्याची शक्यता…

  • २०१३ ला मी महाराष्ट्र पिंजत असताना मराठा समाजाच्या संघटना एकत्र आल्या.
  • त्यांनी मला नेतृत्व करायला सांगितलं.
  • त्यानंतर २०१३ रोजी आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चा काढला.
  • त्यानंतर राणे समिती आली आणि आरक्षण मिळालं.
  • ते टिकलं नाही.
  • २०१७ रोजी आझाद मैदानात मोर्चा निघाला.
  • त्यावेळी स्टेजवर जाण्याची कुणाचं धाडस नव्हतं.
  • हिंदू-मुस्लिम, दलित-मराठा, ओबीसी-मराठा वाद होण्याची शक्यता होती.
  • इंटेलिन्स विभाग आणि समन्वयकांनी मला स्टेजवर जायला सांगितलं.
  • तुम्ही स्टेजवर गेला नाही तर गालबोट लागेल असं सांगितलं.
  • त्यामुळे मी स्टेजवर गेलो आणि दोन मिनिटात मनोगत मांडलं.
  • लोकांनी माझं म्हणणं ऐकलं आणि लोकं परत गेली.

 

सरकारने दोन महिन्यात मागण्या मान्य केल्या नाही…

  • मराठा समालाजाला एसीबीसीचं आरक्षण मिळालं.
  • पण नंतर सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं.
  • मराठा समाज पुढारलेला वर्ग आहे असं सांगून आरक्षण देऊ शकत नसल्याचं कोर्टाने सांगितलं.
  • त्यानंतर मी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढला.
  • राज्य आणि केंद्राची जबाबदारी सांगितली.
  • रिव्ह्यू पिटीशन दाखल करणं ही राज्याची जबाबदारी असल्याचं मी सांगितलं.
  • आरक्षण हा दीर्घकालीन विषय आहे.
  • त्याला वर्ष सहा महिनेही लागतील.
  • ते मी सांगू शकत नाही. मी वकील नाही.
  • त्यानंतर कोल्हापुरात मूक आंदोलन केलं.
  • हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.
  • त्यानंतर सरकारने आम्हाला बोलावलं.
  • मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
  • समन्वयक होते.
  • कॅबिनेट मंत्रीही होते.
  • त्यावेळी आम्ही सहा ते सात मागण्या मांडल्या.
  • सरकारने सांगितलं १५ दिवसात मागण्या मार्गी लावतो. आम्ही म्हटलं दोन महिने घ्या पण मार्गी लावा.
  • पण सरकारने दोन महिन्यात मागण्या मान्य केल्या नाही.

 

म्हणून मी आमरण उपोषण सुरू केलंय…

  • त्यानंतर आम्ही नांदेडला आंदोलन केलं.
  • रायगडला आंदोलन केलं. पण सरकारने शब्द पाळला नाही.
  • शब्द न पाळल्याने मला दुसरा पर्याय राहिला नाही.
  • मी जी चळवळ सुरू केली.
  • त्यात समाज वेठीस धरला जाऊ नये म्हणून मी आमरण उपोषण सुरू केलं आहे.
  • १७ जूनला ज्या मागण्या केल्या होत्या.
  • त्याच मागण्या आहेत.
  • त्यात तसूभरही बदल केला नाही.
  • पण सरकारने मागण्या मान्य केल्या नाही.

Tags: Azad MaidanMaratha Reservationmp sambhaji chhatrapatiमराठा_आरक्षणमराठाआरक्षणसंभाजीराजे छत्रपती
Previous Post

#मुक्तपीठ LiVE एकच रण, मराठा आरक्षण! खासदार संभाजी राजे छत्रपती उपोषण

Next Post

मराठी भाषा गौरव दिनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

Next Post
Marathi Bhasa Din

मराठी भाषा गौरव दिनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!