मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे छत्रपतींनी उपोषणाला सुरुवात केली असून यासंदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून १५ दिवसात या मागण्या मंजूर करणाऱ्या सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. म्हणूनच मी आजपासून उपोषणाला बसलो आहे,असे सांगितले.
हिंदू-मुस्लिम, दलित-मराठा, ओबीसी-मराठा वाद होण्याची शक्यता…
- २०१३ ला मी महाराष्ट्र पिंजत असताना मराठा समाजाच्या संघटना एकत्र आल्या.
- त्यांनी मला नेतृत्व करायला सांगितलं.
- त्यानंतर २०१३ रोजी आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चा काढला.
- त्यानंतर राणे समिती आली आणि आरक्षण मिळालं.
- ते टिकलं नाही.
- २०१७ रोजी आझाद मैदानात मोर्चा निघाला.
- त्यावेळी स्टेजवर जाण्याची कुणाचं धाडस नव्हतं.
- हिंदू-मुस्लिम, दलित-मराठा, ओबीसी-मराठा वाद होण्याची शक्यता होती.
- इंटेलिन्स विभाग आणि समन्वयकांनी मला स्टेजवर जायला सांगितलं.
- तुम्ही स्टेजवर गेला नाही तर गालबोट लागेल असं सांगितलं.
- त्यामुळे मी स्टेजवर गेलो आणि दोन मिनिटात मनोगत मांडलं.
- लोकांनी माझं म्हणणं ऐकलं आणि लोकं परत गेली.
सरकारने दोन महिन्यात मागण्या मान्य केल्या नाही…
- मराठा समालाजाला एसीबीसीचं आरक्षण मिळालं.
- पण नंतर सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं.
- मराठा समाज पुढारलेला वर्ग आहे असं सांगून आरक्षण देऊ शकत नसल्याचं कोर्टाने सांगितलं.
- त्यानंतर मी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढला.
- राज्य आणि केंद्राची जबाबदारी सांगितली.
- रिव्ह्यू पिटीशन दाखल करणं ही राज्याची जबाबदारी असल्याचं मी सांगितलं.
- आरक्षण हा दीर्घकालीन विषय आहे.
- त्याला वर्ष सहा महिनेही लागतील.
- ते मी सांगू शकत नाही. मी वकील नाही.
- त्यानंतर कोल्हापुरात मूक आंदोलन केलं.
- हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.
- त्यानंतर सरकारने आम्हाला बोलावलं.
- मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
- समन्वयक होते.
- कॅबिनेट मंत्रीही होते.
- त्यावेळी आम्ही सहा ते सात मागण्या मांडल्या.
- सरकारने सांगितलं १५ दिवसात मागण्या मार्गी लावतो. आम्ही म्हटलं दोन महिने घ्या पण मार्गी लावा.
- पण सरकारने दोन महिन्यात मागण्या मान्य केल्या नाही.
म्हणून मी आमरण उपोषण सुरू केलंय…
- त्यानंतर आम्ही नांदेडला आंदोलन केलं.
- रायगडला आंदोलन केलं. पण सरकारने शब्द पाळला नाही.
- शब्द न पाळल्याने मला दुसरा पर्याय राहिला नाही.
- मी जी चळवळ सुरू केली.
- त्यात समाज वेठीस धरला जाऊ नये म्हणून मी आमरण उपोषण सुरू केलं आहे.
- १७ जूनला ज्या मागण्या केल्या होत्या.
- त्याच मागण्या आहेत.
- त्यात तसूभरही बदल केला नाही.
- पण सरकारने मागण्या मान्य केल्या नाही.