Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून दडपशाहीचा आरोप

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा आरोप

October 29, 2021
in सरकारी बातम्या
0
Sambhaji Patil Nilangekar

मुक्तपीठ टीम

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीकडून प्रशासनावर दडपण आणून लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे. सत्तेचा वापर करून अनेक ठिकाणी विरोधकांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. याविरोधात राज्यपालांकडे दाद मागणार आहोत, अशी माहिती माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे यावेळी उपस्थित होते.

निलंगेकर यांनी सांगितले की, सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने लातूर, बीड, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत प्रशासनावर दबाव आणून विरोधी उमेदवारांचे अर्ज नियमबाह्य पद्धतीने बाद ठरविले गेले. विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद ठरवून बिनविरोध निवडणुका जाहीर केल्या गेल्या. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा गळा घोटून आपल्या हुकूमशाही वृत्तीचे दर्शन घडविले आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एकाच परिवारातील साखर कारखान्यांना ६०० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. फडणवीस सरकार सत्तेत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व सभासदांना मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला होता. मात्र महविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारचा हा निर्णय रद्द केला. लातूर जिल्ह्यात फक्त ८०० जणांना मतदानाचा हक्क देण्यात आला होता. आम्ही या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या संदर्भात आमदार धीरज देशमुखांच्या नावाने नोटीस काढली आहे. ज्यांच्या नावाने खासगी , सहकारी संस्था कंपन्या आहेत अशांना जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत अर्ज दाखल करता येत नाही. मात्र काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेनेच्या अशा उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले गेले. शेतकऱ्यांना मतदानाचा दिलेला मूलभूत अधिकार काढून घेऊन त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवले गेले. बँकेने थकबाकी नसल्याचे पत्र ज्यांना दिले गेले होते , त्यांनाही थकबाकीदार असल्याचे कळवत त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दडपण आणले गेले, असेही निलंगेकर यांनी नमूद केले.


Tags: BJPlatur bank electionMVASambhaji Patil Nilangekarभाजपामहाविकास आघाडीसंभाजी पाटील निलंगेकर
Previous Post

“काळया यादीतील कंत्राटदारांना ‘पावन’ करून घेण्यासाठी मंत्र्याने घेतली १०० कोटींची ‘सुपारी'”

Next Post

नंदुरबार तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर

Next Post
nandurbar

नंदुरबार तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!