Sunday, May 25, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षणासाठी खा. संभाजी छत्रपतींचा पुन्हा एल्गार! २५ ऑक्टोबरपासून दौरा!!

October 13, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sambhaji chhatrapati (2)

मुक्तपीठ टीम

राज्य सरकार राज्याची जबाबदारी पाळत नाही. सरकारला अल्टिमेटम दिला होता. पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही. आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची? असा संतप्त सवाल करत खासदार संभाजी छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. येत्या २५ ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.

 

२५ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा

  • खासदार संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.
  • येत्या २५ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे.
  • रायगडपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे.
  • राज्य सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलं नाही.
  • सारथीचा एक मुद्दा सोडला तर इतर मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे.

राज्य सरकारने आश्वासन पाळलं नाही

  • राज्य सरकार राज्याची जबाबदारी पाळत नाही.
  • सरकारला अल्टिमेटम दिला होता.
  • पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही.
  • आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची?,
  • तसेच कुणी टीका करतयं त्याकडे मी लक्ष देत नाही.
  • टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा.

या आहेत मराठा समाजाच्या मागण्या

मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह

  • मराठा तरुणांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहांच्या उभारणीची समाजाची मागणी आहे.
  • त्याबाबत ३६ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांमध्ये सरकार वसतीगृह उभरणार आहे.
  • सरकारची इमारत असलेल्या जिल्ह्यांची निवड त्यासाठी करण्यात आली आहे.
  • त्यासाठी लागणाऱ्या पैशाची जबाबदारी सरकार घेणार आहे, अशी ग्वाही सरकारनं दिल्याचंही ते म्हणाले होते.

 

प्रलंबित नियुक्त्या

  • एमपीएससीच्या नियुक्तांबाबत विशेष बाब म्हणून मुलांना नियुक्त्या द्या अशी मागणी आम्ही केलीय.
  • सुपर न्युमररी अर्थात अधिसंख्येची जागा देण्याबाबतचा पर्यायही सरकारला सुचवला आहे.
  • त्यावर सरकारने अटर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांना सांगितलं आहे.
  • कायदेशीर बाबी तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
  • महत्वाची बाब म्हणजे या जागांमुळे सरकारवर आर्थिक भार वाढणार आहे.
  • तो भार सोसू असा शब्द सरकारनं दिल्याचं संभाजी छत्रपतींनी सांगितलं होतं.

 

कोपर्डी बलात्कार प्रकरण

  • २०१७ ला फाशीची शिक्षा झालेल्या दोषीने २०१९ला अपील केलंय.
  • सरकारने याबाबत अपील करण्याची, स्पेशल बेंच नेमण्याची मागणी केली.
  • त्यावर सरकारने अपील केल्याचं सांगितलं.
  • तसंच १ जुलैपासून फिजिकल हिअरिंगला सुरुवात होणार.
  • तेव्हा सरकारकडून स्पेशल बेंचची मागणी केली जाणार आहे.

गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा

  • मराठा आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने आश्वासन दिलंय.
  • १४९ पैकी एकच गुन्हा मागे घेता येणार नाही.
  • बाकी गुन्हे मागे घेण्याबाबत कोर्टात अपील करणार अशल्याचं सरकारनं सांगितलं.
  • त्याचबरोबर एक समिती स्ठापन केली जाणार आहे.
  • ही समिती मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांसोबत दैनंदिन बैठक होणार.
  • त्या बैठकीत या सर्व गोष्टी युद्धपातळीवर कशा मार्गी लावल्या जातील त्याबाबत दैनंदिन चर्चा होईल.

 

अण्णासाहेब पाटील महामंडळ

  • कर्जाची मर्यादा १० लाखावरून २५ लाखापर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.
  • त्यालाही सरकारनं मान्यता दिलीय.
  • त्याचबरोबर मराठा समाजातील मुलांचे शिक्षण, शिक्षणासाठी परदेशात जाण्याबाबतही या महामंडळामार्फत मदतीचा पर्याय आहे.

Tags: Maratha Reservationsambhaji chhatraptistate govtमराठा आरक्षणराज्य सरकारसंभाजी छत्रपती
Previous Post

“जनतेच्या मनात पोलीसांबद्दल विश्वास निर्माण करा”: दिलीप वळसे-पाटील

Next Post

आयकर खात्याची धाड…१४२ कोटीची रोकड जप्त! कार्यालय औषध कंपनीचं!!

Next Post
income tax

आयकर खात्याची धाड...१४२ कोटीची रोकड जप्त! कार्यालय औषध कंपनीचं!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra
featured

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

by Tulsidas Bhoite
May 24, 2025
0

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

April 8, 2025
जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!