Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पराभवानंतर आघाडीवर टीकेचा मारा! संभाजी छत्रपती, सोमय्या, मनसे सारेच सरसावले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Oposition criticise shivsena

मुक्तपीठ टीम

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव करत भाजपाच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. महाडिक यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीसह शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. संजय पवार यांच्या पराभवानंतर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाकडून टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. संभाजी छत्रपती, किरीट सोमय्या आणि मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

संभाजीराजे छत्रपतींचा ट्वीटमधून शिवसेनेवर खोचक शब्दांत टोला!!

  • राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता.
  • मात्र शिवसेना व संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला.
  • संजय राऊत यांनी तर आमची ४२ मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांना घालण्यात आली होती.
  • पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अटी लादत होती हे आता निकालांनंतर स्पष्ट होऊ लागले आहे.
  • या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांचे ट्वीट चर्चेचा विषय ठरले आहे.
  • जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्वीट करत आपल्या भावना मांडलेल्या आहेत…
  • वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगी||

  • तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ||

  • म्हणजेच, “वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. पण असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते”.

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll

तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll

— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2022

ठाकरे यांचे माफिया सरकारचे काउन्ट डाउन सुरु, सोमय्यांचा सूचक इशारा…

  • राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.
  • धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर भाजपाने शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली आहे.
  • या विजयानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
  • ‘ठाकरे यांचे माफिया सरकारचे काउन्ट डाउन, उलटी गिनती सुरु’ असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.

राज्यसभा निवडणूक… ठाकरे यांचे माफिया सरकार चे काउन्ट डाऊन उलटी गिनती सुरू

Rajyasabha Election Result.. Thackeray Sarkar Mafia Sarkar’s Count Down Started @BJP4India @Dev_Fadnavis

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 11, 2022

शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम- मनसेचा टोला!!

  • राज्यसभेच्या या निकालानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
  • “शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ” टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले,” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले.

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 11, 2022


Tags: BJPKirit SomaiyamnsRajyaSabha Election Resultsambhaji chhatrapatiShivsenaकिरीट सोमय्याभाजपामनसेराज्यसभा निवडणूक निकालशिवसेनासंभाजी छत्रपती
Previous Post

आयपीएल पाहणाऱ्यांमुळे बीसीसीआयला मिळणार ४५ ते ६० हजार कोटी!

Next Post

#मुक्तपीठ #Live भाजपाचा राज्यसभा विजयोत्सव! देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील

Next Post
#मुक्तपीठ #Live भाजपाचा राज्यसभा विजयोत्सव! देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील

#मुक्तपीठ #Live भाजपाचा राज्यसभा विजयोत्सव! देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!