मुक्तपीठ टीम
खासदार संभाजी छत्रपतींनी मराठा आरक्षणासाठी आजपासून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना ते जाणून घेणार आहेत. २७ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी ते घेतील. कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद आणि नांदेडचा दौरा संभाजी छत्रपती आज करतील. आज कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचं दर्शन घेऊन, शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. पत्रकारांसोबत संवाद साधून त्यांनी आपल्या दौऱ्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 24, 2021
काय म्हणाले संभाजी छत्रपती?
- माझा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे.
- मराठवाडा आणि खान्देशात जाऊन समाजाची भावना जाणून घेणार आहे.
- २७ मे रोजी मुंबईत जाणार आहे.
- मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यांची माहिती सरकारला देणार आहे.
- आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. यातून समाजाच्या व्यथा समजून गेता येतील.
- केंद्र आणि राज्य सरकारला मदत करण्याचीच आमची भूमिका आहे. पण या समाजाला कोणीही वेठीस धरू नये. समाजाची दिशाभूल होऊ नये.
- समाज अस्वस्थ आहे. मात्र कोरोना काळात जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. आंदोलनापेक्षाही जीव वाचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकारने समाज रस्त्यावर उतरणार नाही याची खबरदारी घ्यावी.
- आंदोलन आणि उद्रेक हा शब्द काढणंही योग्य नाही. सर्व पक्षीय नेत्यांनी या प्रश्नावर काय मार्ग काढता येईल ते पाहावं.
कोल्हापूरातील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक, आरक्षणाचे अभ्यासक, इतिहास संशोधक, विविध क्षेत्रातील विचारवंत तसेच इतर समाजातील प्रमुख व्यक्तींबरोबर संवाद साधला.
मराठा आरक्षणाविषयी सर्वांची मते जाणून घेतली.
सर्वच स्तरातून मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा मिळत आहे.#मराठा_आरक्षण pic.twitter.com/4MftxUpy1Y— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 24, 2021