मुक्तपीठ टीम
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या हेतून खासदार संभाजी छत्रपती राज्यभर दौरे करत आहेत. सध्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. तर आज बीडच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसी समाजाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच कोणत्याही पक्षाविरोधात त्यांचा लढा नसल्याचेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले संभाजी छत्रपती?
• ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जाती विषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा असून कुठल्याही पक्षा विरोधात माझा लढा नाही.
• लोकप्रतिनिधींनी आता मराठा समाजाला वेठीस धरू नये.
• सगळ्या पुढाऱ्यांनी कायद्याचा योग्य पद्धतीने अभ्यास करावा आणि आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यावे.
• बीडमध्ये संभाजी छत्रपतींनी केले आवाहन.
…तर राजीनामा देण्यासही तयार!
• मी राजीनामा देऊन मराठ्यांचा आरक्षण प्रश्न मार्गी लागणार आहे का?
• मार्ग निघणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे.
• मराठा आरक्षण प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मराठ्यांना आरक्षण मिळण्यासंदर्भात सकारात्मक आहेत.
• तसेच ओबीसींना राजकीय मिळण्याच्या लढ्याला पाठिंबा असून त्याविषयी अभ्यास सुरु आहे.
मला मुख्यमंत्री करा…
• दरम्यान, बीडमध्ये एका कार्यक्रमात संभाजी छत्रपतींवर कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली होती.
• त्यावेळी मराठा समाजाचा ओबीसीच समावेश करा अशी मागणी आपण का करीत नाही? असा प्रश्न विचारला.
• त्यावार संभाजी छत्रपती थेट म्हणाले की, प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा.
• ते म्हणाले तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना विचारा, पण त्यांच्याकडून उत्तर मिळणार नाहीत.
• संभाजी छत्रपतींनी मला मुख्यमंत्री करा, असे वक्तत्व केल्यानंतर उपस्थितांकडून एकच जल्लोष झाला.