मुक्तपीठ टीम
मुंबईजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. या स्मारकाचे काम सुरुही झाले आहे. मात्र या स्मारकाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. अरबी समुद्राऐवजी स्मारक मुंबईतील राजभवनाच्या जागेवर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच स्मारक बनवण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून राज्यभरात मोहीम राबवली जाणार आहे.
जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचे पूजन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे अनेक यावेळी उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राजभवनात उभारा!
- छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील अरबी समुद्रात भव्यदिव्य स्मारक होणार आहे.
- या स्मारकाचे काम सध्या सुरु आहे.
- मात्र त्याला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध केला आहे.
- शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्यापेक्षा राजभवनाच्या जागेवर उभारण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
- तसेच स्मारक बनवण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून राज्यभरात मोहीम राबवली जाणार आहे.
- १९ फेब्रुवारीच्या आधी संभाजी ब्रिगेडचे कार्यक्रते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतची भूमिका मांडणार आहेत.
- राजभवनाची जागा उपलब्ध करून दिली तर संभाजी ब्रिगेड गावागावात जाऊन निधी उभारणीचे काम करणार आहे.
- तशी माहिती संभाजी ब्रिगेडने दिली आहे.
जिजाऊ जन्मोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा
- १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला.
- ४२४ व्या जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सिंधखेडराजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून झाली.
- यावेळी आज सकाळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांनी माँसाहेब जिजाऊ यांचे पूजन केले.
- यावेळी शासकीय पूजाही संपन्न झाली आहे.
- पूजनवेळी अनेक जिजाऊ भक्त उपस्थित होते. पूजनादरम्यान जय जिजाऊ जय जिजाऊ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.
- कोरोनामुळे यावर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होतोय.
- मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसार यावर्षी फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतो आहे.