उदयराज वडामकर / कोल्हापूर
कोल्हापूर म्हटलं की अंबामाता, कुस्त्यांची तालिम, तांबडा पांढरा रस्ता जसा आठवतात तसेच कोल्हापूरी चप्पलही! कोल्हापूर चप्पल ही आता ब्रँड बनली आहे. कोल्हापुरी चप्पल आपल्या आवाजातून जणू कोल्हापूरकरांच्या स्वभावातील करारीपणाच दर्शवित असते. वरून अत्यंत मजबूत असली तरी आतून अनुभूती मात्र सुखकारक असे वैशिष्ट्य कोल्हापुरी चपलेचे सांगितले जाते. लोकराजे शाहू महाराजांना वंदन करण्यासाठी ‘चप्पल लाईन’ येथे ‘कोल्हापूर चप्पल जत्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या जत्रेचे श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयश्री जाधव प्रमुख उपस्थित होते. यावेळी कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘राजर्षी शाहू वसा आणि वारसा’ या पुस्तिकेच्या प्रति उपस्थितांना देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बनवण्यात आलेल्या भव्य अशा कोल्हापुरी चप्पलच्या प्रतिकृती सर्व नागरिकांना आकर्षित करत होत्या. या प्रतिकृती सोबत सेल्फी काढण्यासाठी एकच झुंबड उडाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरी चप्पलच्या माध्यमातून कोल्हापूरची ओळख कशी निर्माण झाली असे अनुभव अनेकांनी संगितले.
कोल्हापुरी चप्पल खरेदीवर २० टक्के सवलत ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन
शंभर वर्षांहून अधिक काळापासून कोल्हापुरी चप्पल उद्योग सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह देश विदेशात कोल्हापुरी चप्पल ब्रँडला मागणी वाढत आहे. यामुळेच कोल्हापुरी चप्पल उद्योगाला दिवसेंदिवस अधिक चालना मिळेल, असा विश्वास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केला.
‘चप्पल लाईन’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कोल्हापूर चप्पल जत्रेचे’ श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयश्री जाधव प्रमुख उपस्थित होते. यावेळी कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘राजर्षी शाहू वसा आणि वारसा’ या पुस्तिकेच्या प्रति उपस्थितांना देण्यात आल्या.
राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवाजी पुतळा परिसरातील महानगरपालिकेच्या गाळेधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. येथील गाळ्यांचे भाडे तसेच कोल्हापुरी चप्पल व्यावसायिक व विक्रेत्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे चप्पल व्यावसायिकांशी जवळीकतेचे नाते होते. चप्पल व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. यापुढेही अडचणी सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल, असे सांगून कृतज्ञता पर्व अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध प्रदर्शनांमुळे कोरोनामुळे दोन वर्ष थंडावलेल्या बाजारपेठेला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या, कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरची ओळख आहे. मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींना कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी गूळ भेट म्हणून दिला आहे. आपणही कुटुंबीयांसह येऊन कोल्हापुरी चप्पल प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बलकवडे यांनी केले.
कोल्हापुरी चप्पल उद्योग व्यावसायिकांच्यावतीने चप्पल उद्योजक तथा माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी या प्रदर्शनात चप्पल खरेदीवर २० टक्के सवलत देत असल्याचे जाहीर केले. यावेळी प्रदीप कापडिया, चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी, जयेश ओसवाल, कोल्हापूर फूटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, भूपाल शेटे, नंदकुमार गुजर उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ: