Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रभू रामाच्या पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी भारत गौरव ट्रेन! आयआरसीटीसीची ऑफर!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Bharat Gaurav Train

मुक्तपीठ टीम

भगवान रामावर श्रद्धा असलेल्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. भगवान राम भक्तांसाठी आयआरसीटीसीकडून एक खास भेट दिली जात आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीद्वारे २१ जून रोजी पहिली भारत गौरव पर्यटक ट्रेन चालवली जाईल. यात्रेकरूंना नेपाळमधील जनकपूरलाही भेट देण्यास मिळणार आहे. प्रवाशी भगवान रामाशी संबंधित ठिकाणी आता या योजनेमुळे भेट देता येणार आहे.

स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ओळखल्या गेलेल्या रामायण सर्किटवर ही ट्रेन धावेल

  • स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ओळखल्या गेलेल्या रामायण सर्किटवर भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चालवली जात आहे.
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रवासात रामाच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या प्रमुख ठिकाणांचा समावेश असेल.
  • यामध्ये नेपाळमधील जनकपूर येथील राम जानकी मंदिराचा समावेश आहे.

भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचा १८ दिवसांचा प्रवास असणार

  • भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचा प्रवास १८ दिवसांचा असेल, ज्याचे पहिले स्थळ भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत असेल.
  • अयोध्येत पर्यटक रामजन्मभूमी मंदिर आणि हनुमान मंदिराला भेट देतील आणि भगवान रामाचा धाकटा भाऊ भरत यांच्या नंदीग्राम मंदिरालाही भेट देतील.
  • अयोध्येनंतर ही ट्रेन बिहारमधील बक्सर येथे थांबेल.
  • यानंतर ट्रेन सीतामढीला सीताजींच्या जन्मस्थानाच्या दर्शनासाठी जाईल आणि प्रवासी रस्त्याने नेपाळमधील जनकपूरला जातील.
  • प्रवासी जनकपूरमधील हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम करतील आणि तेथील प्रसिद्ध राम-जानकी मंदिराला भेट देतील.
  • सीतामढीनंतर ट्रेन वाराणसीला जाईल.
  • याशिवाय ही गाडी नाशिक, किष्किंधा हंपी आणि रामेश्वरम इत्यादी ठिकाणीही जाणार आहे.

भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा

  • भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.
  • या ट्रेनला एसी ३ क्लासचे डबे असतील. याशिवाय आधुनिक किचन कार असतील, ज्यातून प्रवाशांना स्वादिष्ट शाकाहारी जेवण दिले जाईल.
  • अन्न प्रवाशांच्या बर्थपर्यंत पोहोचवली जाईल. एवढेच नाही तर, प्रवाशांच्या मनोरंजनासाठी आणि माहितीसाठी इन्फोटेनमेंट सिस्टीमही बसवण्यात आली आहे. ट्रेनमध्ये सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेतली जाणार आहे.

हप्त्यांमध्ये देखील पैसे भरता येणार

  • भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमध्ये १८ दिवसांच्या प्रवासासाठी तुम्ही प्रति व्यक्ती ६२,३७० रुपये भाडे निश्चित केले आहे.
  • त्याचे तिकीट बुकिंग यूपीाय पेमेंटद्वारे देखील करता येते.
  • सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रवासी हे भाडे सुलभ हप्त्यांमध्येही भरू शकतात.
  • प्रवासी भाडे ३, ६, ९, १२, १८ आणि २४ महिन्यांच्या हप्त्यांमध्ये भरू शकतात.
  • हप्त्यांमध्ये पेमेंट करण्याची सुविधा फक्त डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे बुकिंग केल्यावर उपलब्ध असेल.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Bharat Gaurav Traingood newsirctcmuktpeethPavitra Bhagwan Ram SthalPrabhu Ramआयआरसीटीसीचांगली बातमीपवित्र भगवान राम स्थळप्रभू रामभारत गौरव ट्रेनमुक्तपीठ
Previous Post

लोकराजे राजर्षी शाहू महाराजांना वंदन, ‘चप्पल लाईन’मध्ये ‘कोल्हापूर चप्पल जत्रा’

Next Post

टाटा मोटर्सच्या ऐसचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच, मालवाहतूक, फुड व्यवसायासाठी उपयोगी

Next Post
Tata Ace

टाटा मोटर्सच्या ऐसचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच, मालवाहतूक, फुड व्यवसायासाठी उपयोगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!