मुक्तपीठ टीम
चिमूटभर मीठ जेवणाला गोडी आणत. मिठाशिवाय जेवण निरस आणि बेचव लागते. हेच मीठ जेव्हा कलाविष्कार साकारेल तेव्हा काय होईल ते गडहिंग्लजच्या शिवाजी चौगुले यांनी दाखवून दिले आहे. मीठाने त्यांनी रांगोळी साकारली आणि सामाजिक संदेशांमध्ये आकर्षकतेची चव आणली. सार्वजनिक आरोग्य विभागात शिपाई या पदावर असलेल्या शिवाजी विठ्ठल चौगुले यांनी ही किमया साधली आहे. शिवाजी यांना बालपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यांना चित्रकलेचा कोर्स करता येत नव्हता. तरीही एकलव्यासारखी साधना करून त्यांनी कलाप्रेम जोपासले. त्यातूनच मग मीठाने रांगोळी काढणे सुरु झाले.
आपल्या कलेला ते सामाजिक संदेश देऊन जनजागरणासाठी उपयोगात आणतात. कोरोना लसीकरणाच्या गडहिंगल्जमधील शुभारंभासाठी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात १०० किलो जाडे मीठ, १० किलो रंग वापरत रांगोळी साकारली. तबल ९ तास कलेची साधना करुन त्यांनी रांगोळी साकारली. त्यांच्या रांगोळीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबानी तोंड भरून कौतुक केले. उपजिल्हा रुग्णालय वैदकीय अधीक्षक, डॉ दिलीप आंबोळे साहेब व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा शिपाई असणाऱ्या शिवाजी चौगुलेंसाठी चौफेर होणाऱ्या कौतुकाचे मोल हे इतर कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे आहे.
पाहा व्हिडीओ: