Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधीच शिक्षणसेवकांना तुटपुंज वेतन…सरकारने तेही थकवलं!

थकीत वेतनाविरोधात संघटनेचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
teacher

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली होती. त्यानुसार नाशिक, अहमदनगरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षकांची नियुक्ती करून भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण केला गेला. तुटपुंज्या वेतनावर २०२०च्या फेब्रुवारी २०२० पासून नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात नियुक्त झालेले अनेक शिक्षक थकीत वेतना अभावी कोरोना काळात हलाखीचे जीवन जगत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

सरकारने आम्हाला लवकरात लवकर थकीत वेतन द्यावे, अशी मागणी नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांनी केली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांतील शिक्षकांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षकांना दैनंदिन खर्चासाठीही संघर्ष करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन तीन आठवड्यात शिक्षकांचे थकित वेतन जमा न केल्यास संघटना राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाचा इशारा डी.एड, बी.एड, स्टुडन्ट असोसिएशन संघटनेने दिला आहे.

 

आधीचं तुटपुंज वेतन, तेही विनाकारण थकवले!

  • कोरोना संकटातही शिक्षक सेवकांना काम करावे लागत आहे.
  • शिक्षणसेवकांना विमाकवच नाही की वैद्यकीय सुविधा नाही.
  • हक्काचे वेतन गेल्या १० ते ११ महिन्यापासून थकीत आहेत.
  • नाशिक मध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांच्या वेतनासाठी आवश्यक असलेला शालार्थ आयडी वेतन पथक माध्यमिक विभागाचे अधीक्षक यांनी गेल्या चार महिन्यांपासून अडवून ठेवला आहे.
  • असे आयडी काढताना चिरीमिरी द्यावी लागते नाहीतर काम रोखून ठेवले जाते, असा आरोप होत आहे.
  • अहमदनगर येथील ७० ते ८० शिक्षणसेवकांचे दहा महिन्यापेक्षा अधिकचे वेतन माध्यमिक विभागाने शासनाचा कुठलाच लिखित आदेश नसताना थकून ठेवला आहे.

 

वेतन थकवले जाण्यासाठी जबाबदार असलेले पुण्याचे संचालक कार्यालय आणि नाशिकचे विभागीय उपसंचालक कार्यालय यांना संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. येत्या तीन आठवड्यात शिक्षणसेवकांचे थकित वेतन जमा न केल्यास संघटना राज्यव्यापी बेमुदत आंदोलन हाती घेईल. या कोरोना काळात वेतनाअभावी शिक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल, असे डी.एड, बी.एड, स्टुडन्ट असोसिएशन संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे बजावण्यात आले आहे.

 

हे निवेदन संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष संदीप कांबळे, उपाध्यक्षा अर्चना सानप, राज्य सचिव प्रशांत शिंदे, राज्य सरचिटणीस प्रा. राम जाधव, राज्य संघटक प्रा. वैभव फटांगरे, राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. वैभव गरड, तुषार देशमुख आदि पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. सदर आंदोलनाला ‘अखिल महाराष्ट्रीय नेट, सेट, बी. एड, डी. एड पात्रता धारक संघटना, महाराष्ट्र राज्य, ‘रयत सेवक मित्र मंडळ सातारा’, पवित्र पोर्टल असोसिएशन, म. न. पा. पुणे आदि संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे.

कोणत्या शिक्षण सेवकांना किती वेतन?

  1. प्राथमिक ६ हजार
  2. माध्यमिक ८ हजार
  3. उच्च माध्यमिक ९ हजार

(ज्यांचे वेतन थकीत आहे ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे शिक्षणसेवक आहे.)


Tags: Maharashtra govtpavitra portalteachersडी.एडपवित्र पोर्टलबी.एडमहाराष्ट्र शासनशिक्षक भरतीस्टुडन्ट असोसिएशन
Previous Post

#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात डॉक्टरांसाठी सेवा संधी

Next Post
central railway

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात डॉक्टरांसाठी सेवा संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!