Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चौथा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर!! विरोधक संतापले…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Safran Company

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारे प्रकल्प एकापाठोपाठ महाराष्ट्राबाहेर जात आहेत. वेदांता फायरफॉक्स, टाटा एअरबस प्रकल्पापाठोपाठ नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे.

सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला का गेला?

  • सॅफ्रन कंपनी ही फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी आहे.
  • ही कंपनी विमान तसंच रॉकेटचे इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचे काम करते.
  • ही कंपनी मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती.
  • गेल्या दोन वर्षापासून नागपुरच्या मिहानमध्ये प्रकल्पासाठी जमिनीची चाचपणी करत होती.
  • मात्र, त्यांना आवश्यक तशी जमीन या ठिकाणी उपलब्ध झाली नसल्याने आणि सरकारच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे.
  • दरम्यान, याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता!!!

  • सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीचा युनिट टाकणार होती.
  • वर्षाला इथे २५० विमानांची इंजन दुरुस्ती व देखभाल केली जाणार होती.
  • त्यासाठी कंपनीची १ हजार ११५ कोटींची प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती.
  • या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता.
  • मात्र सरकारच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला.
  • कंपनीचे सीईवो यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन प्रकल्प हैदराबादला हलवण्याची माहिती दिली आहे.

विरोधकांची सरकारवर टीकेची झोड-

  • एकापाठोपाठ तीन मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे सराकरवर जोरदार टीकेची झोड सुरु आहे.
  • सत्तेच्या हव्यासापोटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केलं असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. तसेच प्रकल्प राज्याबाहेर जाणे म्हणजे हा राजकीय करंटेपणा आहे. सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या जनतेचं सरकारनं नुकसान केल्याचे लोंढे म्हणाले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते बघून दु:ख वाटत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


Tags: HyderabadMihannagpurSafran Projectनागपूरमिहानसॅफ्रन प्रकल्पहैदराबाद
Previous Post

कापूस आणि धान खरेदी केंद्रांसाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next Post

संवेदनशीलता पोलिसांची, आदिवासी पाड्यांवर वंचितांची दिवाळी साजरी!

Next Post
Manchar Police Station Police Diwali Celebration

संवेदनशीलता पोलिसांची, आदिवासी पाड्यांवर वंचितांची दिवाळी साजरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!