मुक्तपीठ टीम
राज्यात गाजलेल्या १०० कोटी वसुलीच्या प्रकरणाला आता वेगळचं वळण आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पैशांसाठी कोणतीही मागणी केली नव्हती. त्याशिवाय आपण कोणत्याही बार मालकाकडून अथवा त्यांच्याशी संबंधितांकडून पैसे घेतले नाहीत, असा गौप्यस्फोट सचिन वाझेने चांदीवाला आयोगासमोर केला आहे.
सचिन वाझेचा जबाब?
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखयांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.
- या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
- आयोगाला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत.
- निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने आज चांदिवाल आयोगासमोर जबाब नोंदवला.
- अनिल देशमुख यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी त्यांची उलट तपासणी केली.
- यावेळी सचिन वाझेने अनिल देशमुख अथवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी करण्यात आली नव्हती असे म्हटले.
- त्याशिवाय आपण कोणत्याही बार मालकाकडून अथवा त्यांच्याशी संबंधितांकडून पैसे घेतले नाही असेही वाझेने आपल्या जबाबात म्हटले.
- आता चांदिवाल आयोगाने पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी ठेवली आहे.
नेमकं प्रकरण काय?
- परमबीर सिंह यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते.
- या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेला १०० कोटींची खंडणी जमा करायला सांगितल्याचा आरोप केला होता.
- त्यानंतर अनिल देशमुख यांना या खंडणीच्या आरोपात आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
- तर, राज्य सरकारने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची नेमणूक केली आहे.
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीपासून १०० कोटीच्या खंडणीचे आरोप फेटाळून लावले होते.