Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सचिन वाझेंची ‘लाच यादी’ एनआयएकडे! खाऊभाऊ वरिष्ठ गोत्यात!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sachin waze

मुक्तपीठ टीम

उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणाचा तपास करताना एनआयएला रोजच नवी धक्कादायक माहिती मिळत आहे. वाझेंशी संबंधित काही कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. यामध्ये मुंबई पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा उल्लेख आहे. त्यांची नावे आणि रकमांसह असलेली यादीच एनआयएच्या हाती लागली आहे

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेच्या चौकशीसंदर्भात एनआयएने याप्रकरणी गुरुवारी गिरगाव भागातील एका क्लबवर छापा टाकला होता. त्यावेळी पथकाला एक डायरी सापडली होती. त्यामध्ये काही महत्त्वाची आकडेवारी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. ती आकडेवारी काही पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या लाचेसंबंधी असून, महिनावार ती मांडण्यात आली आहे, असे एनआयए पथकाचे म्हणणे आहे. ७ एप्रिलपर्यंत वाझे एनआयएच्या ताब्यात आहेत. एकप्रकारे ती लाचेची यादीच आहे.

 

सीबीआयकडे कागदपत्रे दिली जाणार

एनआयएकडून लवकरच ही माहिती जाहीर केली जाण्याचीही शक्यता आहे. परंतु त्याआधी त्या क्लबमालकाची कसून चौकशी होणार आहे. त्यामुळे गरज भासल्यास हे दस्तावेज आर्थिक तपासासाठी प्राप्तिकर विभाग किंवा सीबीआयकडेदेखील सोपवले जातील, असे पथकातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 

शिंदेंला क्लबमध्ये नोकरी लावली

या क्लबमध्ये वाझेंचा सतत वावर होता. त्यांनीच या क्लबमध्ये नरेश गौर आणि सहकारी आरोपी विनायक शिंदे यांनाही नोकरीला लावले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दोघेही सध्या एनआयएच्या ताब्यात आहेत.

कागदपत्रात काय आहे

  • अधिकाऱ्यांनी सांगितले की, कागदपत्रात कार्यालये आणि पदांसह अधिकाऱ्यांची नावे आहे.
  • नावांपुढे रकमेचा उल्लेख आहे, त्यांची यादी बनवली गेली आहे.
  • अधिकाऱ्यांचा संशय आहे की कार्यालये आणि अधिकाऱ्यांच्या नावासमोर लिहिलेले पैसे लाच असू शकते, जी दरमहा दिली जात असावी.

Tags: एनआयएमुकेश अंबानीसचिन वाझे
Previous Post

’यू’ आकारात वेढून रॉकेट लाँचरनेही घातपात…तरीही नक्षलवाद्यांशी लढले जवान!

Next Post

सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचं काय?

Next Post
chandrakant patil

सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचं काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!