मुक्तपीठ टीम
मास्टर बास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात स्वत: सचिनने ट्विट करत ही माहिती दिली आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून योग्य ती काळजी घेत आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे कोरोनाची टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच घरातील इतर सदस्यांची चाचणी केली असून ते निगेटिव्ह असल्याचे सचिनने सांगितले आहे.
कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळत काळजी घेत आहे. याआधीही चाचण्या केल्या होत्या मात्र, आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. तसेच डॉक्टरांच्या नियमांचे पालनही करत आहे, असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
नुकतीच पार पडलेल्या रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये सचिनने भारत लिजंड्समध्ये नेतृत्व केले होते. त्यामुळे तो अंतिम सामना खेळून परतताना संपर्कात आलेल्या सर्वांना चाचणी करून सुरक्षित राहण्याचे आवाहनही सचिनने केले आहे.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरांमध्ये निर्बंध लावण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
हेही वाचा: महाराष्ट्रात रविवारपासून रात्रीची जमावबंदी म्हणजे नेमकं काय?