Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्रिकेटचा देव पावला! कोकणातील शेतकरी कन्येचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकारणार!

July 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
st

मुक्तपीठ टीम

क्रिकेटचा देव आणि माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या उदार मनाचे आणखी एक उदाहरण जगासमोर आले आहे. रत्नागिरी येथील १९ वर्षीय दिप्ती विश्वासरावचं डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सचिन तेंडुलकरनं मदतीचा हात पुढे केला आहे. दिप्तीचं हे स्वप्न पुर्ण झाल्यास ती गावातील पहिली डॉक्टर ठरणार आहे.

 

शेतकरी कुटुंबातील दिप्तीला सचिन तेंडुलकर आणि त्याची संस्था सेवा सहयोग फाऊंडेशनने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ‘सहयोग फाउंडेशन’ या संस्थेने ट्वीट करत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले की, “रत्नागिरीच्या झर्ये गावातील दीप्ती विश्वासराव आता तिच्या गावातील पहिली डॉक्टर होणार आहे. सचिन तेंडुलकर यांचे आभार. तिचे वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याचे स्वप्न आता साकारत आहे. दिप्ती आणि इतर अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सहभागी झाल्याबद्दल सचिनचे आभार!”

Dipti Vishvasrao from Zarye, Ratnagiri is now all set to become the 1st doctor from her village. Thanks to @sachin_rt’s involvement!
Her dream of going to medical college is now within reach. Thank you Sachin, for being part of Dipti’s, and several other students’ journey. pic.twitter.com/kTCGWi8o6h

— Seva Sahayog Foundation (@sevasahayog) July 27, 2021

तेंडुलकरनं ट्वीट केलं की, स्वप्नांचा पाठलाग करून ते सत्यात उतरवणे काय असते हे दीप्तीच्या प्रवासातून दिसते. तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, तिला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. सचिनच्या संस्थेनं गेल्या १२ वर्षांत चार राज्यांतील २४ जिल्ह्यांमधील ८३३ मुलांना आर्थिक मदत केली.

 

Dipti’s journey is a shining example of chasing one’s dreams and making them a reality.

Her story will inspire many others to work hard towards their goals.
My best wishes to Dipti for the future! https://t.co/n4BMOuP1yp

— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 27, 2021

दिप्तीचा शिक्षणासाठी संघर्ष

  • शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिप्तीला शिक्षणासाठी आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.
  • दिप्तीनं नीट परिक्षेत ७२० पैकी ५७४ गुण मिळवले आणि त्याच जोरावर तिनं अकोला येथील सरकारी वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळविला.
  • नातेवाईक, शेजारी यांच्याकडून पैसे उसणे घेत कुटुंबाने तिचे प्रवेश शुल्क भरले, मात्र दीप्तीच्या इतर खर्चासाठी पैश्याची गरज होती, अशावेळी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर या कुटुंबीयांना पावला.
  • सचिन तेंडुलकर फाऊंडेशननं तिला स्कॉलरशिप दिली.

 

दिप्तीही साकारणार हुशार गरजूंचे स्वप्न

  • सचिन तेंडुलकर यांच्या फाऊंडेशनच्या स्कॉलरशिपमुळे शिक्षणाचा प्रश्न सुटल्यामुळे दिप्ती आनंदली असतानाच तिनं एक संकल्पही केलाय.
  • या स्कॉलरशिपमुळे माझ्या अभ्यासासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाचा भार उचलला जाणाराय.
  • त्यामुळे मला आता फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करता येणार आहे.
  • डॉक्टर बनण्याचे माझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
  • अथक परिश्रम करून भविष्यात मी अनेक हुशार व गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेन, हे मी वचन देते!

Tags: Dipti Vishvasraoratnagirisachin tendulkarSeva Sahayog Foundationदिप्ती विश्वासरावरत्नागिरीसचिन तेंडुलकरसहयोग फाउंडेशन
Previous Post

युवक राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंची मदत

Next Post

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये ९९ जागांसाठी भरती

Next Post
whatsapp becil

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये ९९ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!