Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युवक राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंची मदत

July 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
NCP

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांना शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी अत्यावश्यक वस्तूंची मदत पाठविली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते झेंडा दाखवत सदरची मदत पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली. यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, संजय खैरनार, अनिता भामरे, महेश भामरे, मकरंद सोमवंशी आदि पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांच्या घरातील संस्कार पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. पूरग्रस्त बांधवाना त्यांचे संसार उभे करण्यासाठी त्यांना मदत म्हणून आपण त्यांच्या सोबत उभा रहाणे आवश्यक आहे. याच विचारातून पूरग्रस्तांच्या मदतीकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरसावली असून विविध प्रकारच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. पूरग्रस्त भागात सर्वत्र चिखल पसरला असल्याने पूरग्रस्तांना शिजवलेले अन्न मिळू शकत नसल्याने युवक राष्ट्रवादीने बिस्कीट व पाणी बॉटलचे बॉक्स पाठविले आहेत.

पूर ओसरला असला तरीही सदर भागात चिखलगाळ अजूनही आहे. तो काढण्यासाठी झाडू, खराटे तसेच अन्य सामग्रीची गरज भासत आहे. दुकाने बंद असल्यामुळे ही सामग्री कुठून आणायची हा प्रश्न पडत असल्याने फावडे, पाटी, ग्लोज, फिनेल व खराटा पाठविण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून अनेकजण नेसत्या कपड्यांसह राहत असल्याने त्यांना इतर आजार होऊ नये याकरिता आरोग्याची काळजी घेत माता- भगिनींना साड्या तसेच लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना सर्दीचा त्रास होऊ नये याकरिता लहान मुले व वयोवृद्धांसाठी उबदार अंथरुणांकरिता ब्लँकेट पाठीवण्यात आले आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना त्रास होऊन इतर आजार जडू नयेत याकरिता सॅनिटरी नॅपकिन्सची मदत करण्यात आली आहे. यासोबत कपडे धुण्याचे व अंघोळीचे साबण, टूथपेस्ट, ब्रश यासारख्या अत्यावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये याकरिता मास्क व सॅनिटाझरचा समावेश ही यात करण्यात आला आहे.

 

पूरग्रस्तांना मदतीकरिता जय कोतवाल, राहुल तुपे,  नितीन-बाळा निगळ, निलेश भंदुरे, विशाल डोखे, सोनू वायकर, संतोष जगताप, सागर बेदरकर, रामदास मेदगे,  राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, किरण पानकर, डॉ.संदीप चव्हाण, राहुल घोडे, सचिन मोगल, संदीप गांगुर्डे, सुनिल घुगे, अक्षय पाटील, भूषण गायकवाड, संदीप खैरे, कल्पेश जेजुरकर, प्रफुल्ल पाटील, उदय सराफ, चेतन दिघे, विजय देवरे, वैजनाथ कड, संतोष गोवर्धने, कुणाल घस्टे, चेतन काळे, जानू नवले, भावेश निर्वाण, राजेश्वर साळुंखे, कैलास दीरवाणी आदींनी पुढाकार घेतला.


Tags: chhagan bhujbalflood areaKonkanMaharashtraमंत्री छगन भुजबळयुकव राष्ट्रवादी
Previous Post

‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार: अजित पवार

Next Post

क्रिकेटचा देव पावला! कोकणातील शेतकरी कन्येचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकारणार!

Next Post
st

क्रिकेटचा देव पावला! कोकणातील शेतकरी कन्येचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकारणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!