Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“न्यायाला विलंब होऊ नये, ही जनतेची अपेक्षा! नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल!” सामनाचा अलर्ट!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray And Supreme Court

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे. सध्या देशात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट, महाराष्ट्रातील परीस्थिती, बिहारमधील सत्तांतर आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांवरील कारवाई या सगळ्या गोष्टींवरून सामानातून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. तसेच देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. पण या न्यायनिवाड्यास विलंब होऊ नये, एवढीच जनतेची अपेक्षा आहे. नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल!, असा इशाराही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात?

विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम!!

  • देशाची परिस्थिती संभ्रमित झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
  • अशा अनेक संभ्रमित गोष्टींचे सध्या पेव फुटले आहे.
  • सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे असे जे सुरू आहे त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले.
  • ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला.
  • ‘दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन कमळ ‘फेल’ गेले आहे.
  • भाजप उघडा पडला आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
  • बिहारमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ चालले नाही व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी अमित शहा यांना खुले आव्हान दिले की, ईडी, सीबीआय वगैरे लावून माझे सरकार पाडून दाखवा.
  • महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत.
  • सगळ्यांत महत्त्वाची घडामोड दिल्ली राज्यात घडली.
  • ईडी, सीबीआयचा वापर करून केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

देशाची स्थिती संभ्रमित !!

  • दिल्ली सरकारचे मद्य धोरण, त्यांची अबकारी नीती, त्यांनी मद्यविक्रेत्यांना दिलेले ठेके हा भाजपच्या दृष्टीने टीकेचा विषय असेल, पण तो निर्णय व्यक्तिगत नव्हता, तर संपूर्ण सरकारचा होता व त्यात दिल्लीच्या नायब राज्यपालांचाही समावेश असतो, पण ‘कॅबिनेट’च्या निर्णयाचे खापर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांवर फोडून त्यांच्यावर सीबीआयने धाडी टाकल्या.
  • त्यांना या प्रकरणात पहिल्या क्रमांकाचे आरोपी केले व हे प्रकरण आता ईडीकडे, म्हणजे भाजपच्या विशेष शाखेकडे सुपूर्द केले.
  • मनीष सिसोदियांवर अटकेची टांगती तलवार आहे.
  • सिसोदिया हे काही पळून जाणारे गृहस्थ नाहीत, पण एखाद्या गुन्हेगारांप्रमाणे त्यांच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस जारी करून लोकनियुक्त सरकारची मानहानी केली गेली.
  • म्हणूनच देशाची स्थिती संभ्रमित आहे, असे श्री. पवार म्हणतात ते खरे आहे.
  • हे सर्व केजरीवाल यांचे सरकार पाडण्यासाठी सुरू आहे.
  • आता श्री. मनीष सिसोदिया यांनी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’वर बॉम्ब टाकला आहे.
  • भाजपमध्ये प्रवेश करा, आपचे आमदार फोडून आणा व मुख्यमंत्री व्हा. तसे केल्यास आपल्या विरोधातील ईडी, सीबीआयची सर्व प्रकरणे बंद करू,अशी ऑफर भाजपने दिल्याचा दावा सिसोदिया यांनी केला.

सिसोदिया हे छत्रपती शिवरायांच्या मावळयाप्रमाणे गरजले!!

  • ‘आप’चे आमदार फोडण्यासाठी वीस-वीस कोटी रुपयांची ‘ऑफर’ दिल्याचा आरोप तर स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच केला आहे.
  • त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी किती घातक आहे हे किळसवाण्या पद्धतीने समोर आले. महाराष्ट्रात याच पद्धतीने ऑपरेशन केले गेले, पण मोठे राज्य असल्याने व शिवसेना पहडणे हाच मुख्य अजेंडा असल्याने ईडीचा धाक अधिक पन्नास ‘खोके’ अशी बेगमी केली असे सर्रास बोलले जाते.
  • महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली तसे दिल्लीचे आमदार व त्यांचे नेते पळाले नाहीत.
  • ते भाजप व ईडीविरोधात ठामपणे उभे राहिले.
  • महाराष्ट्रात शिवसेना नेते संजय राऊत हे बेडरपणे ईडीला सामोरे गेले.
  • ते महाटी बाण्याने लढले, पण वाकले नाहीत व सच्च्या शिवसैनिकाप्रमाणे झुंजले.
  • तसेच कडक धोरण मनीष सिसोदिया यांनी स्वीकारले.
  • सिसोदिया हे छत्रपती शिवरायांच्या मावळयाप्रमाणे गरजले.
  • स्वाभिमानाची तलवार हातात घेऊन त्यांनी सांगितले, कारस्थाने करणाऱ्या भ्रष्ट लोकांपुढे आपण अजिबात झुकणार नाही.

ना पेशी ना सुनवाई तारखांचाच खेळ सुरू!!

  • दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया पुढे म्हणतात ते महत्त्वांचे, मी महाराणा प्रताप यांचा वंशज आणि राजपूत आहे.
  • माझा शिरच्छेद केला गेला तरी चालेल, पण भ्रष्ट आणि षड्यंत्र रचणाऱ्या लोकांपुढे मी कधीच झुकणार नाही.
  • हेच माझे भाजपला उत्तर आहे.
  • माझ्या विरोधातील सर्व प्रकरणे खोटी आहेत.
  • तुम्हाला जे करायचे ते करा!
  • श्री. सिसोदिया यांनी हे सर्व हिमतीने सांगितले.
  • मरण पत्करीन, पण शरण जाणार नाही.
  • मला खोट्या प्रकरणात गुंतवले आहे,असे संजय राऊत शेवटपर्यंत म्हणाले व तुरुंगात जाणे त्यांनी पसंत केले.
  • महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा, नाहीतर ईडीचा फास आवळू, अशा धमक्या त्यांनाही दिल्या गेल्या होत्या.
  • शिवाय राऊत यांनी हा सर्व प्रसंग राज्यसभेचे तत्कालिन सभापती व्यंकय्या नायडू यांनाही कळवला होता.
  • पण सध्या कोण कोणाचे ऐकणार? ना पेशी ना सुनवाई तारखांचाच खेळ सुरू आहे.
  • महाराष्ट्रात गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक, खासदार संजय राऊत यांचा आवाज दडपण्यासाठीच त्यांना उचलून तुरुंगात टाकले गेले.
  • दिल्लीचे मोहल्ला क्लिनिकवाले मंत्री सत्येंद्र जैन यांना जुन्या प्रकरणात पकडले.
  • अबकारी धोरणात सरकारी तिजोरीचा घाटा झाला म्हणून मनीष सिसोदियांवर कारवाई सुरू आहे.
  • मग या ईडी-सीबीआयवाल्यांना आमचा प्रश्न आहे.
  • गेल्या सात-आठ वर्षात ज्या घिसाडघाईने सार्वजनिक क्षेत्रांच्या कंपन्या, विमानतळांची विक्री झाली त्यातून सरकारचा काय फायदा-तोटा झाला व त्यावर या तपास यंत्रणांनी कोणती कारवाई केली?

जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल!

  • बिहारात सत्तापरिवर्तन होताच राष्ट्रीय जनता दलावर सीबीआय, ईडीच्या धाडी पडाव्यात हा निव्वळ योगायोग कसा म्हणावा?
  • पण तेजस्वी यादव यांनी थेट सांगितले “महाराष्ट्रात जे घडले ते बिहारात होणार नाही.
  • बिहार घाबरणार नाही.
  • जे डरपोक आहेत त्यांना ईडी- सीबीआयची भीती दाखवा.
  • मुळात केंद्र सरकार व त्यांच्या सूत्रधारांना २०२४ चे भय वाटते आहे.
  • हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे आहे.
  • या सूत्रधारांना आपल्या सावलीचेही भय वाटते.
  • म्हणून ते नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान यांच्याही मागे लागले, असे दिसते.
  • इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना भय का वाटावे?
  • याचे उत्तर एकच.
  • त्यांचे बहुमत निखळ नाही.
  • ते चोरलेले आहे.
  • म्हणून स्वातंत्र्य व लोकशाही संकटात आहे.
  • अशा स्थितीत जे शरण जातील तेच खरे देशाचे शत्रु धाडसत्र व सूडाची छापेमारी ही त्यांची शस्त्रे त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ’ होते.
  • पण कमळाच्या लाभार्थीवर सरकारी छाप्यांचे वार होत नाहीत देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.
  • पण या न्यायनिवाड्यास विलंब होऊ नये, एवढीच जनतेची अपेक्षा आहे.
  • अर्थात आज राज्यकर्त्याचा कारभारच असा सुरू आहे की, देशात एक संभ्रमित युग अवतरले आहे.
  • या संभ्रमित युगात आता कोण अवतार घेणार? नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल!

Tags: BJPMaharashtrasaamanaSaamana AlertShivsenaUddhav Thackerayभाजपाशिवसेनासामनाचा अलर्ट
Previous Post

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करुन त्याची कठोर अंमलबजावणी करा! – प्रबल प्रतापसिंह जुदेव

Next Post

“मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा”

Next Post
Ashish Shelar

"मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!